Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणकारी घटक केस मजबूत करण्यासोबतच केसांची झपाट्याने वाढ करतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 09:30 AM
केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा 'या' पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा 'या' पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाला कायमच आपले केस सुंदर आणि काळेभोर हवे असतात. केसांच्या चमकदार वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे हेअर शाम्पू आणि कंडिशर केसांच्या वाढीसाठी वापरले जाते. हल्ली प्रत्येकाला केसांच्या काहींना काही समस्या कायमच उद्भवतात. केस गळणे, केसांमध्ये टक्कल पडणे, कोंडा, टाळूवर वाढलेले इन्फेक्शन तर काहीवेळा केसांसंबधित गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. काहींचे केस झपाट्याने वाढतात तर काहींचे केस वर्षानुवर्षे सुद्धा वाढत नाहीत. केसांच्या घनदाट वाढीसाठी केसांना आवश्यक पोषण देणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. महागड्या शाम्पूसोबतच आहारात सुद्धा पौष्टिक आणि केसांच्या वाढीस गुणकारी ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात.टाळूवर वाढलेल्या चिकट कोंड्यामुळे केस खूप जास्त गळतात आणि केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेले हेअर केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चमचाभर मेथी दाण्यांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळेल आणि केस अतिशय चमकदार, सुंदर आणि काळेभोर दिसतील. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

चमचाभर मेथी दाण्यांचा या पद्धतीने करा वापर:

केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. यामुळे केस अतिशय मऊ आणि मजबूत होतात. हेअर मास्क तयार करण्यासाठी मेथी आणि दही इतकेच साहित्य लागणार आहे. हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, चमचाभर मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे दह्यात टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेली पेस्ट जास्त पातळ किंवा घट्टसर करू नये. तयार केलेल्या मिश्रणात चमचाभर खोबरेल तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा.

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

तयार केलेला हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस विंचरून घ्यावेत. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत हेअर मास्क लावून घ्या. त्यानंतर अर्धा किंवा पाऊण तास ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. केस धुवण्यासाठी अतिशय सौम्य शाम्पूचा वापर करावा. आठवड्यातून एकदा हेअर मास्क केसांच्या मुळांवर लावल्यास केस चमकदार आणि काळेभोर होण्यास मदत होईल. महिनाभर केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी हेअर मास्क लावल्यास केसांची झपाट्याने वाढ होईल. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे सुद्धा थांबते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stunted hair growth then use a spoonful of fenugreek seeds in this way hair will grow faster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप
1

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
2

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
3

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग नियमित करा घरी बनवलेल्या बायोटीनयुक्त गोळीचे सेवन, केसांची होईल वाढ
4

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग नियमित करा घरी बनवलेल्या बायोटीनयुक्त गोळीचे सेवन, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.