अभिनेत्री माधुरी दीक्षित केसांना लावते किचनमधील हे नैसर्गिक पदार्थ, पहा सुंदर केसांचे ब्युटी सीक्रेट
सर्वच महिलांना अभिनेत्रींप्रमाणे चमकदार त्वचा आणि काळेभोर मऊ केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार दिसावे म्हणून सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारातील महागड्या केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात तर कधी शाम्पू, कंडिशर लावून केसांची काळजी घेतली जाते. पण सतत वापरलेल्या केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते आणि केस झाडूसारखे रखरखीत होऊन जातात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या अभिनयामुळेच नाहीतर तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा फेमस आहे. माधुरी दीक्षित सिनेमापासून दूर असून सुद्धा तिचा मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे. एका युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून तिने चमकदार केसांसाठी कोणता हेअर मास्क वापरावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तरुण वयातील मुलामुलींपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचं केसांच्या समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणत्याही हानिकारक केमिकल असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. केस चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी केवळ हेअर मास्कच नाहीतर केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. हेअर मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावावा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते. माधुरीने सांगितलेला हेअर मास्क बनवण्यासाठी पिकलेलं केळ, खोबरेल तेल आणि मध इतकेच साहित्य लागणार आहे. कमीत कमी साहित्यात तयार केलेला हेअर मास्क केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका वाटीमध्ये पिकलेलं केळ घेऊन चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्या. तयार केलेल्या केळीच्या मिश्रणात खोबऱ्याचे तेल आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा. हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस फणीने विंचरून घ्या. त्यानंतर तयार केलेला हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
केळीचे मिश्रण केसांना खोलवर पोषण देते. याशिवाय मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी केला जातो. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेलामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होतो आणि टाळूवरील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. मध केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी मदत करते. माधुरी दीक्षित केसांच्या निरोगी वाढीसाठी २० दिवसांमधून एकदा केळीचे हेअर मास्क केसांना लावावा.






