Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! ‘या’ पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट

आंबा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण चुकीच्या पद्धतीमध्ये आंब्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आंब्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 08:18 AM
पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! 'या' पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! 'या' पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट

Follow Us
Close
Follow Us:

आंब्याचे सेवन करण्याची पद्धत?
आंबा खाण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
मधुमेह असलेल्या रुग्णांनी दिवसभरात किती आंबे खावे?

कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचा पिकलेला आंबा खायला खूप जास्त आवडतो. रसाळ आणि गोड चवीचा हापूस आंबा जेवणाची चव वाढवतो. आंबा पाहिल्यानंतर तो खाण्याचा मोह अजिबात आवरत नाही. पण मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात आंब्याचे सेवन करताना शरीराची योग्य काळजी घ्यावी. कारण आंब्याचा गोडवा रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतो, असे अनेकांना कायमच वाटते. साखर वाढेल या भीतीने आंब्याचे सेवन जास्त केले जात नाही. आंब्याची एक फोड खाऊन त्यावरच समाधान मानले जाते. यामध्ये विटामिन सी, फायबर, विटामिन ए सारखी अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचेला सुद्धा भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

एका आंब्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ४१ ते ६० च्या दरम्यान असते. हे पदार्थ मध्यम श्रेणीत येतो. १०० ग्रॅम आंब्यामध्ये साधारणपणे १४ ग्रॅम नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे पूर्ण पिकलेला आंबा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतो. तसेच कैरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असते. कैरी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही. आंब्याचे सेवन करताना शरीराची योग्य काळजी घ्यावी. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिप्रमाणात आंब्याचे सेवन करू नये. मधुमेह असलेले रुग्ण लहान आकाराचा एक आंबा खाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया पिकलेला आंबा खाण्याची योग्य पद्धत.

रक्तातील साखर वाढू नये म्हणून ‘या’ पद्धतीमध्ये करा आंब्याचे सेवन:

पिकलेला आंबा कायमच प्रथिने किंवा हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांसोबत खावा. आंबा दही, विविध बिया, बदाम इत्यादी अनेक पदार्थांमध्ये मिक्स करून खाऊ शकता. त्यामुळे आंबा खाताना तो कमी पिकलेला खावा. कारण लहान आकाराच्या आंब्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी थेट आंब्याचे सेवन करण्याऐवजी आंब्याची स्मूदी, सॅलड इत्यादी पदार्थांमध्ये मिक्स करून खावा. याशिवाय रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन करू नका. उपाशी पोटी आंबा खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

मॅंगो ज्यूस किंवा आमरस पिण्यापेक्षा आंब्याच्या फोडी करून खाव्यात. ज्यूस बनवल्यानंतर त्यातील फायबर कमी होऊन जाते. पण मधुमेहाचा खूप जास्त त्रास असलेल्या लोकांनी आंब्याचे सेवन करू नये. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त आंब्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे मधुमेह झाल्यास शरीराची योग्य काळजी घ्यावी. आंबा खाण्याआधी काहीवेळ मिठाच्या पाण्यात ठेवावा. यामुळे आंब्याचा चीक कमी होतो आणि आंब्याची साल मऊ होऊन जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आंबा खाऊ शकतो का?

    Ans: हो, पण मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास आंबा खाऊ शकतात.

  • Que: आंबा खाल्ल्याने शुगर वाढते का?

    Ans: जास्त प्रमाणात खाल्ल्यास शुगर वाढू शकते, त्यामुळे प्रमाण आणि वेळ महत्त्वाची असते.

  • Que: मधुमेह रुग्णांनी कोणती फळे टाळावीत?

    Ans: जास्त साखर असलेली फळे जसे केळी, द्राक्षे आणि आंबा मोठ्या प्रमाणात टाळावा.

Web Title: Sugar will not rise at all after eating a ripe mango consume mangoes in this way the risk of diabetes will be eliminated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • diabetes
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश
1

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi
2

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे
3

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

Hemophilia म्हणजे काय? रक्तस्त्राव थांबवण्याचा शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

Hemophilia म्हणजे काय? रक्तस्त्राव थांबवण्याचा शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.