लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचा समावेश
रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी काय खावे?
कामाची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरातील हिमोग्लोबिन पातळी कमी झाल्यानंतर फारसे लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने कमी झाल्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले ऑक्सिजन मिळत नाही. यासोबतच थकवा, चक्कर, फिकट त्वचा होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच विकसनशील देशांमध्ये महिला आणि मुलांमध्ये ॲनिमिया होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य – istock)
गर्भवती महिलांची लोह किंवा आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. बऱ्याचदा रक्त कमी झाल्यानंतर छोटी मोठी काम करताना खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा अचानक चक्कर येते. डिहायड्रेशन किंवा थकवा समजून शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालक, बीट, गाजर यांचा नियमित समावेश करावा. रोजच्या आहारात बीटचा रस बनवून प्यायल्यास शरीरातील रक्ताची पातळी भरून निघते. गूळ-शेंगदाणे, काळे चणे, मसूर डाळ, राजमा, खजूर, काळे मनुके, अंजीर, बदाम, डाळिंब, सफरचंद आणि टरबूज इत्यादी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे महिनाभरात तुमचे कमी झालेले रक्त भरून निघण्यास मदत होईल. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये लोह आणि विटामिन बी १२ मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय मासे आणि खेकडे खाल्ल्यास शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल आणि थकवा, अशक्तपणा कमी होईल.
Ans: ॲनिमिया हा आजार लाल रक्तपेशी (RBC) किंवा हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे होतो.
Ans: पालक, बीट, डाळी, खजूर, मनुके, अंडी, मांस आणि लोहयुक्त अन्न खावे.
Ans: थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा फिकट दिसणे, श्वास घेण्यास त्रास ही सामान्य लक्षणे आहेत.






