Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा

Mango Rice Recipe : आंब्यापासून आईस्क्रिम, ज्यूस, शेक असे अनेक पदार्थ बनवून तुम्ही खाल्ले असतील पण आंब्याचा पुलाव ही रेसिपी अनेकांना माहिती नाही. चवीला हा हलका गोड लागतो आणि उन्हाळ्यात खास करुन बनवला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 09:40 AM
Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा

Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा

Follow Us
Follow Us:
  • आंबा अनेकांना खायला आवडतो.
  • तुम्ही कधी आंब्याचा पुलाव ट्राय केला आहे का?
  • हा पुलाव चवीला फार अप्रतिम लागतो.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो. आंब्यापासून बनवलेले शेक, लस्सी, आईस्क्रीम किंवा विविध गोड पदार्थ आपण अनेकदा चाखले असतील. पण फार कमी लोकांनी आंबा पुलावाची चव चाखली आहे. हा पुलाव चवीला फार अप्रतिक लागतो. पिकलेल्या आंब्याची नैसर्गिक गोडी, सुगंधी बासमती तांदूळ आणि सुका मेव्याची कुरकुरीत चव यांचे अप्रतिम मिश्रण या पुलावात अनुभवायला मिळते. हा पदार्थ खास पाहुण्यांसाठी किंवा एखाद्या विशेष जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय तो कमी वेळात तयार होतो आणि त्याची आकर्षक चव सर्वांनाच आवडते. चला तर मग, घरच्या घरी स्वादिष्ट आंबा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही रोझ पिस्ता बर्फी, नोट करा रेसिपी

साहित्य

  • १ कप बासमती तांदूळ
  • १ ½ कप पिकलेल्या आंब्याचे तुकडे
  • २ मोठे चमचे आंब्याचा गर
  • २ मोठे चमचे तूप
  • १० काजू
  • १० बदाम (बारीक कापलेले)
  • १ मोठा चमचा मनुका
  • ३ हिरव्या वेलची
  • केशराचे काही धागे (कोमट दुधात भिजवलेले)
  • २ मोठे चमचे गूळ पावडर किंवा साखर (ऑप्शनल)
  • २ कप पाणी
Bread Rasmalai: घरच्या घरी १५ मिनिटांत झटपट तयार करा ब्रेड रसमलाई; जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती

  • बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर तांदूळ शिजवून घ्या.
  • तांदळाचे दाणे मोकळे राहतील याची काळजी घ्या आणि शिजलेला भात थंड होऊ द्या.
  • एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुका हलके सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • आता त्यात वेलची आणि केशर मिसळलेले दूध घाला. काही सेकंद हलवत शिजवा, जेणेकरून सुगंध छान खुलून येईल.
  • यानंतर आंब्याचा गर आणि गूळ पावडर किंवा साखर घालून मंद आचेवर थोडावेळ शिजवा.
  • तयार मिश्रणात शिजवलेला भात आणि आंब्याचे तुकडे घाला. भाताचे दाणे तुटणार नाहीत याची काळजी घेत
  • हलक्या हाताने सर्व साहित्य एकत्र करा.
  • शेवटी भाजलेला सुका मेवा वरून पसरवा आणि काही मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून सर्व चव एकमेकांत छान मुरेल.
  • गरम किंवा कोमट आंबा पुलाव सर्व्ह करा आणि उन्हाळ्यातील या खास स्वादाचा आनंद घ्या.
 

Web Title: Summer special make tasty mango pulao at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.