भारतीय गोड पदार्थांमध्ये रसमलाई हा अनेकांचा आवडता डेझर्ट मानला जातो. सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी रसमलाईची चव जेवणाची मजा अधिक वाढवते. पारंपरिक रसमलाई तयार करण्यासाठी छेना तयार करावा लागतो, त्यामुळे ही रेसिपी बनवण्यासाठी वेळ लागतो. मात्र, तुम्ही छेना न वापरता फक्त ब्रेडच्या मदतीने झटपट आणि स्वादिष्ट रसमलाई तयार करु शकता. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तुम्हाला देखील डेझर्टमध्ये काही तरी गोड पदार्थ बनवायचे असेल तर ही ब्रेड रसमलाईची झटपट रेसिपी नक्की ट्राय करा.
Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो
६ ब्रेड स्लाइस
१ लिटर दूध
५ चमचे साखर
अर्धा चमचा वेलची पावडर
काही केशरच्या काड्या
ड्रायफ्रूट्स (बदाम, पिस्ता)
तूप
कंडेन्स्ड मिल्क
सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळा. त्यानंतर त्यात साखर, वेलची पावडर आणि केशर घालून चांगले मिसळा. अधिक चविष्ट बनवण्यासाठी कंडेन्स्ड मिल्कही घालू शकता. ब्रेडच्या स्लाइसचे कडे काढून गोल आकारात कापून घ्या. नंतर तव्यावर थोडे तूप लावून ब्रेड हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तयार ब्रेड स्लाइस एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर गरम रबडीसारखे दूध ओता. त्यानंतर वरून बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. ब्रेड रसमलाई काही वेळ फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर ही रसमलाई सर्व्ह करा.घरच्या घरी कमी वेळात तयार होणारी ही ब्रेड रसमलाई सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी उत्तम डेझर्ट ठरू शकते.
Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार






