Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update:रुग्णालयातील एनसीडी सुविधांचे सर्वेक्षण! आरोग्य संस्थांकडून पायाभूत सुविधांची विस्तृत माहिती मागवली

एनसीडी कार्यक्रमांतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग आदी असंसर्गजन्य आजारांवरील सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि सर्वेक्षण करणे महत्वाचे मानले जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 08:45 AM
रुग्णालयातील एनसीडी सुविधांचे सर्वेक्षण! आरोग्य संस्थांकडून पायाभूत सुविधांची विस्तृत माहिती मागवली

रुग्णालयातील एनसीडी सुविधांचे सर्वेक्षण! आरोग्य संस्थांकडून पायाभूत सुविधांची विस्तृत माहिती मागवली

Follow Us
Follow Us:

मुंबईः राज्यातील असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील उपलब्ध पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि वैद्यकीय साधनसामग्रीचा तपशील मागविला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या एनसीडी सेलने सर्व वैद्यकीय महाविद्यालये, विशेष रुग्णालये, परिघीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, आरोग्य केंद्रे आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश वल्लेपवार यांच्या आदेशानुसार ही माहिती राज्य एनसीडी सेलला तातडीने देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – AI)

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

विशेष म्हणजे, भविष्यातील औषधे, निदान साहित्य, उपकरणे आणि अन्य लॉजिस्टिक पुरवठ्याचे नियोजन या माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या आरोग्य संस्थेकडे कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या बाबींची कमतरता आहे, याचे वास्तव चित्र राज्य सरकारला मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रातील सूत्रांच्या मते, एनसीडी कार्यक्रमांतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग आदी असंसर्गजन्य आजारांवरील सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, यावेळी प्रथमच विविध आरोग्य संस्थांमध्ये असणे आवश्यक असलेल्या किमान सुविधा व संसाधनांबाबतही स्पष्ट निकष देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोणकोणते आहेत निकष ?

असंसर्गजन्य आजार सेवांमधील उपकरण जसे रक्तातील साखर तपासण्यासाठी लागणारा ग्लुकोमीटर, तर रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी लागणारा पल्स ऑक्सिमीटर, फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्पायरोमीटर, अगदी पॅलिएटिव्ह केअरमध्ये रुग्णांना लागणारा वॉटर बेड सारखी उपकरण असोत किंवा कर्करोग निदानात गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी लागणार कोल्पोस्कोप, तर उपचारासाठी लागणारे लीप मशीन अशी उपकरण प्रत्येक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार हवीत.

जसे ग्लुकोमीटर हे प्रत्येक उपकेंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्लिनिकमध्ये देखील २ हवेत तर ऑक्सिमीटर हे प्रत्येक पथकाकडे आणि क्लिनिकमध्ये १ हवे. तर १०० खाटा असलेल्या रुग्णालयात इको कार्डिओग्राफी मशीन किमान १ तरी हवी. आदी निकष आरोग्य संस्थेनुसार तपासले जात आहेत.

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

आरोग्य सेवांमधील या देखरेखीतून राज्यातील एनसीडी सेवांची सद्यस्थिती, पायाभूत सुविधांतील तफावत आणि आवश्यक सुधारणांचा आराखडा तयार होईल. यात काय हवे असल्यास ते मिळण्यास मदत होईल. उणीवा भरून काढल्यास रुग्णसेवा मजबूत होण्यास मदत होईल, अशी माहिती – डॉ. भारती राजुलकर, वैद्यकीय अधीक्षक,राजावाडी रुग्णालय यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: NCD म्हणजे काय?

    Ans: NCD म्हणजे Non-Communicable Diseases म्हणजेच संसर्ग न होणारे आजार. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचा समावेश होतो.

  • Que: रुग्णालयातील NCD सुविधांचे सर्वेक्षण का केले जाते?

    Ans: रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता तपासणे, उपलब्ध सुविधा जाणून घेणे आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी असे सर्वेक्षण केले जाते.

  • Que: NCD आजारांचा धोका कसा कमी करता येतो?

    Ans: संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू व धूम्रपान टाळणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे फायदेशीर ठरते.

Web Title: Survey of ncd facilities in hospitals detailed information on infrastructure sought from health institutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Updates
  • women health

संबंधित बातम्या

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय
1

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात
2

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा ‘या’ समावेश
3

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा ‘या’ समावेश

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ
4

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.