Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

घामामुळे वाढलेला चिकटपणा आणि थकवा कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात हे पदार्थ मिक्स करावेत. यामुळे शरीरावर वाढलेली घाण स्वच्छ होण्यासोबतच चिकटपणा कमी होऊन फ्रेश वाटेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 05:30 AM
घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

Follow Us
Follow Us:

घामामुळे वाढलेला चिकटपणा कमी करण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात शारीरिक स्वच्छता कशी करावी?
अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे?

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेचे वारे वाहू लागले आहेत. उष्णतेची लाट आल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाले आहेत. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यांचं घाम येतो. घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण जास्त घाम आल्यामुळे चिकचिक होणे आणि दुर्गंधी निर्माण होणे इत्यादी असंख्य समस्या वाढू लागतात. शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयातच गुडघ्यांमधून उठता-बसता कटकट आवाज येतो? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, हाडांना मिळेल भरून पोषण

शरीर स्वतःचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घाम बाहेर टाकते. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच आवश्यक क्षार सुद्धा बाहेर पडून जातात. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यामुळे अंघोळ केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आणि थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा हे पदार्थ:

बेकिंग सोडा:

सतत येणाऱ्या घामामुळे अंग खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे धूळ, माती आणि मळ अंगावर तसाच साचून राहतो. अशावेळी घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करावा. घामामुळे त्वचेवर तयार होणारे आम्लधर्मीय वातावरण विषाणू शोषून घेतात. ज्यामुळे अंगावर खाज येणे, पुरळ उठणे किंवा त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यामुळे शरीराला घामाचा वास सुद्धा येत नाही.

तुरटी:

मागील अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून नंतर अंघोळ केल्यास शरीर स्वच्छ होईल. तुरटीमध्ये ॲस्ट्रिंजंट आणि अँटीसेप्टिक घटक आढळून येतात, ज्यामुळे अंगावर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच पुरळ आणि इन्फेक्शनचा धोका सुद्धा कमी होऊन जातो. शारीरिक दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.

लिंबाचा रस:

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर सायट्रिक ॲसिड आणि शक्तिशाली अँटी-माइक्रोबियल मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेल्या ऍसिडमुळे त्वचेवर जमा झालेली दुर्गंधी आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबाच्या रसाचा वापर शारीरिक स्वच्छतेसाठी केल्यास दुर्गंध पसरवणारे बॅक्टेरिया जास्त वेळ जिवंत राहत नाही. शरीरावर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी सुद्धा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.

Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम

मीठ:

थकवा, अशक्तपणा आणि शारीरिक स्वच्छतेसाठी अंघोळीच्या पाण्यात नियमित चमचाभर मीठ टाकून अंघोळ करावी. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते आणि शरीर स्वच्छ राहते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा आणि सुस्तपणा कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ टाकावे आणि स्वच्छ अंघोळ करावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घामामुळे सतत थकवा का जाणवतो?

    Ans: अतिरिक्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू शकते.

  • Que: गुलाबपाण्यामुळे मानसिक ताजेपणा मिळू शकतो का?

    Ans: गुलाबपाण्याचा सुगंध मन शांत करण्यास आणि फ्रेश वाटण्यास मदत करू शकतो.

  • Que: उन्हाळ्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे, नियमित झोप घेणे आणि उष्णतेपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Sweating has caused extreme fatigue in the body mix this substance in bath water improve physical and mental health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
1

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
2

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
4

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.