
सर्व्हिक्सची लक्षणे नेमकी काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)
सर्व्हिक्स हा वजायनाला युटेरसशी जोडणारा भाग आहे. या भागात सूज आली तर त्याला सर्वाइकल इंफ्लेमेशन किंवा सर्व्हिसायटिस (Cervicitis) असं म्हटलं जातं. असामान्य स्त्राव, सतत वेदना, जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणं महिलांमध्ये भिती निर्माण करू शकतात. पण ही लक्षणं वेळीच ओळखली तर सर्व्हिसायटिस (cervicitis) सारख्या आजारांचे वेळीच निदान शक्य होते आणि प्रजनन आरोग्य सुरक्षित राहते. डॉ. सुजाता उदय राजपूत, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
महिला का करतात दुर्लक्ष?
अनेक महिला किरकोळ त्रास किंवा बदलांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटतं की हे तात्पुरतं आहे आणि ते आपोआप ठीक होईल. पण शरीर देत असलेल्या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. सर्व्हिसायटिस म्हणजे सर्व्हिक्समध्ये येणारी सूज (इन्फ्लमेशन), जी संसर्ग, चिडचिड किंवा हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते. अस्वच्छता, योनीतील असंतुलन किंवा इन्फेक्शनमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
‘अशी’ लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका
अनेक महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याविषयी बोलताना संकोच वाटतो. पण त्यासंबंधी लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकत.
सर्व्हिसायटिस म्हणजे काय?
ही समस्या बॅक्टेरियल किंवा व्हायरल संसर्गामुळे होऊ शकते. काही वेळा लैंगिक संक्रमित आजार (STIs) जसे क्लॅमिडिया किंवा गोनोरिया यामुळेही उद्भवते. तसेच काही नॉन-इन्फेक्शियस कारणं जसे की स्वच्छतेच्या उत्पादनांवर अॅलर्जी, टॅम्पॉन किंवा गर्भनिरोधक साधनांमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
उपचार न घेतल्यास ही समस्या वाढून पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID) होऊ शकतो, ज्यामुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो. संसर्ग वाढुन गर्भाशय आणि फलोपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे दीर्घकालीन वेदना आणि गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
निदान आणि उपचार
खालील चाचण्यांद्वारे होते सर्व्हिसायटिसचं निदान
काय लक्षात ठेवाल?
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील Cranberry! जाणून घ्या शरीराला होणारे जादुई फायदे