पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरात दिसणारी लक्षणे:
प्रत्येक ऋतूनुसार वातावरणात आणि जीवनशैलीमध्ये अनेक बदल होतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल करावे लागतात. तसेच या दिवसांमध्ये अनेक लोक खूप कमी प्रमाणात पाण्याचे सेवन करतात. शरीराला पाण्याची आवशक्यता असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये कमी प्रमाणात तहान लागते, त्यामुळे पाणी पिण्याची इच्छा होत नाही. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी प्याल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे अनेकदा डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. शरीरात सतत जडपणा जाणवत असेल किंवा डोकं दुखत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाण्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात. ज्याचा परिणाम विचार क्षमतेवर होण्याची शक्यता असते.
थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे. त्वचा कोरडी पडल्यानंतर निस्तेज आणि रुक्ष दिसू लागते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा कोरडी होऊन जाते. ज्यामुळे त्वचेमधील ओलावा निघून जातो. पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवू शकते.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानांतर लघवीचा रंग बदलण्यास सुरुवात होते. यामुळे लघवीला कमी होणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे भरपूर प[पाण्याचे सेवन करावे. पाणी प्याल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. लघवीचा रंग गडद पिवळा झाल्यास शरीरातील पाणी कमी झाले आहे, असे समजावे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तुमच्या ओठांवर जात सतत भेगा पडतील असतील किंवा सतत ओठ फाटत असतील तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. तसेच तोंडामध्ये कोरडेपणा जाणवू लागतो. तोंडात तयार होणारी लाळ कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.