Take Special Measures To Avoid The Heat Of October Heat Ac And Electricity Bills Will Also Be Reduced
October Heat: पुणेकरांनो, उकाडा वाढलाय…? एसीही हवा आणि लाईट बिलही कमी हवे? मग हे करा!
ऑक्टोबर महिन्यात उष्णतेमुळे एसी व फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे वीज बिलेही वाढण्याची शक्यता असते. अशावेळी विजेचा संयमित वापर करा आणि अनावश्यक उपकरणे बंद ठेवा, असे आवाहन वीज कंपन्यांनी पुणेकरांना केले आहे.
ऑक्टोबर हिटच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी करा खास उपाय, एसी आणि लाईट बीलही येईल कमी
Follow Us:
Follow Us:
ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय
२४ अंशांवर ठेवा एसी, वीजेची बचत होईल
वापरात नसताना चार्जर आणि उपकरणे अनप्लग करा.
आकाश ढुमेपाटील पावसाळा मागे सरकला आणि आता ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमान वाढल्याने उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसाढवळ्या उन्हाचा तडाखा, रात्री उकाड्यामुळे झोपेचा खोळंबा — अशा परिस्थितीत एसी आणि पंख्यांचा वापर झपाट्याने वाढला आहे. पण त्यासोबतच वाढतंय ते म्हणजे विजेच्या बिलाचा आकडा.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तसेच ऊर्जा तज्ज्ञांनी विजेची बचत करत गारवा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, एसीचे तापमान २४ अंश सेल्सियसवर सेट केल्यास विजेचा वापर कमी होतो आणि थंडावा टिकतो. तसेच, एसीसोबत सीलिंग फॅन वापरल्यास थंड हवा व्यवस्थित फिरते आणि तापमान कमी वाटते. यामुळे एसीवर ताण कमी येतो आणि वीज बिलही घटते.
ऊर्जाबचतीसाठी या टिप्स लक्षात ठेवा
वापरात नसताना चार्जर आणि उपकरणे अनप्लग करा.
जास्त वीज लागणारी उपकरणे (वॉशिंग मशीन, डिशवॉशर) सकाळी किंवा रात्री वापरा.
ऊर्जा कार्यक्षम (स्टार रेटेड) उपकरणे वापरा.
एकाच वेळी अनेक उपकरणे बंद करण्यासाठी पॉवर स्ट्रिप वापरा.
ऑक्टोबर महिन्यात उष्णतेमुळे एसी व फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे वीज बिलेही वाढण्याची शक्यता असते. अशावेळी विजेचा संयमित वापर करा आणि अनावश्यक उपकरणे बंद ठेवा, असे आवाहन वीज कंपन्यांनी पुणेकरांना केले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे
थोडेसे नियोजन आणि उपकरणांचा योग्य वापर केल्यास महिन्याला वीज बिलात १५ ते २० टक्क्यांची बचत शक्य आहे. २४ अंशांवर एसी ठेवणे आणि फॅन वापरणे हा सर्वात सोपा उपाय आहे,” असे ऊर्जा विश्लेषकांनी सांगितले.
Web Title: Take special measures to avoid the heat of october heat ac and electricity bills will also be reduced