सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान (Photo Credit- X)
कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gangrape) प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आपले मौन सोडले आहे. रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, “मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये,” असे विधान केले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संवेदनशील प्रकरणावर भाष्य करताना सरकारचा बचाव केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणात सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. “हा खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आहे, त्यामुळे विद्यार्थिनीची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी कॉलेज प्रशासनाची होती, सरकारची नाही,” असे मत त्यांनी मांडले.
“Girls should not be allowed to go outside of college at night”: Mamata Banerjee on Durgapur gangrape Read @ANI Story | https://t.co/XrAiEnQaSK#MamataBanerjee #Durgapur #WestBengal pic.twitter.com/CLWGuXxq3F — ANI Digital (@ani_digital) October 12, 2025
ही घटना पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेज परिसराजवळ घडली. ओडिशाची रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी रात्री तिच्या एका मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेली होती. याचदरम्यान, तीन अज्ञात लोकांनी मेडिकल कॉलेज जवळ थांबवले, त्यानंतर तिला जगंलात घेवून जावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेच्या वेळी पीडितेचा मैत्रिणीने घटनास्थळावरून पळून गेला होता.
या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे. याव्यतिरिक्त, एका संशयित व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी परानागंज काली बाडी स्मशानभूमीला लागून असलेल्या जंगल परिसरात रविवारी घेराव घातला. पोलीस दुर्गापूर येथील खासगी मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या गावांमध्येही मोठी शोधमोहीम राबवत आहेत. पुरावे आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील जंगलात ड्रोनचा वापर देखील केला जात आहे. पीडितेचे आई-वडील ओडिशा येथून दुर्गापूरला पोहोचले असून, त्यांनी ‘न्यू टाऊनशिप’ पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. पीडितेवर ती शिक्षण घेत असलेल्या खासगी कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारत असून, तिने पोलिसांना आपला जबाबही नोंदवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…