(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली अनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. करोडो चाहत्यांच्या मनात त्यांचं एक खास स्थान आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, आवाज आणि अभिनय अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
याच महानायकाला भेटण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मराठी अभिनेता स्वप्नील राजशेखर याला नुकतंच हे स्वप्न पूर्ण झालं, आणि या अनुभवाने भारावून जाऊन त्याने एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नील राजशेखर नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटला. ही भेट त्याच्यासाठी केवळ एक सेलिब्रिटी मिटींग नव्हती, तर एक जिवंत स्वप्न होतं.
Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ मध्ये तान्या मित्तलवर का भडकला मृदुल? कुनिका आणि नीलममध्येही झाला वाद
“मै आपको छू के देखना चाहता हु…आप सच मे हो… या कोई जादुई अफवाह फैली हुई है पिछले पचास सालों से?!” “असं मी थरथरत्या आवाजात म्हणालो होतो… त्यावर मनापासुन लोभस हसला होता तो… डोळ्यात कौतुक, प्रेम होतं त्याच्या… (मला तरी जाणवलं.. मनाचे खेळ असतील, तरी असोत…) आणि माझ्या डोळ्यात साक्षात तो दिसल्याचा अविश्वास होता… आपले सगळे मेडीकल प्रोटोकॉल बाजुला ठेवुन हात पुढे करत त्या बच्चनी आवाजात तो म्हणाला “चलिए हाथ मिलाते है…” माझा थरथरता हात काही क्षण त्याच्या हातात होता…”
‘मी घरीही सुरक्षित नाही…’ संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, ‘या’ कारणामुळे घाबरली अभिनेत्री
स्वप्नील पुढे म्हणतो “त्याला भेटायची संधी यापुर्वी एक दोनवेळा आली होती…. पण माझं धाडस होत नव्हतं…. कसं व्हावं… ?! अभिनेता- चाहता एवढंच नाही ना आमचं कनेक्शन!! (त्याच्या बाबतीत एवढ्यापुरतं रहातही नसेल कुणाचं….) माझं आयुष्य त्याने व्यापलेलं… १९७० च्या मध्यातला जन्म माझा… म्हणजे अ अमिताभचा, ब बच्चनचा हेच गिरवलंय आमच्या पिढीने… आणि समज आली तसा मी जो त्याच्या पंथाला लागलो ते आजपर्यंत…. तो समोर दिसला तर मला सहन होईल ?! बेभान झालो तर… ?! लहानपणापासुनचं सगळं प्रेम किंवा त्याहुनही गहिरं जे काही आहे ते उचंबळून आलं तर ?! किंवा समजा त्याला पाहुन विरक्तीच आली, ‘पुरे झालं आता… प्रत्यक्ष तो भेटलाय….’ असं वाटुन संसारातुन मन उडालं तर ?! मुलं आहेत, बायको आहे.. म्हातारी आई आहे… असे विचार मनात यायचे पुर्वी” स्वप्नील यांनी लिहलं, “पण आताशा वाटत होतं की एकदा त्याला बघुया तरी… खरंच आहे का तो !! आंखो देखी होऊ दे… बरं तो आधीसारखा दैवी आणि अप्राप्य राहिलेला नाही आता.. माणुसपणाच्या असंख्य खुणा दिसतायत त्याच्यात… आता सोसवेल मला…आणि अशात यंदा आमचा रोहित हळदीकर एके दिवशी अचानक म्हणाला “दादा, बच्चनला भेटुया चल…” मी हिय्या केला… घरच्यांचा सल्ला घेतला…आणि भेटलो त्याला… दोनवेळा!! तरीही मी जिवंत आहे… दोनदा त्याचा परिसस्पर्श होऊनही… अनुभवलेलं सांगतो… जगात देव आहे… वाढदिवसाच्या शुभेच्चा बिग बी”, असं त्यांनी म्हटलं. स्वप्नील राजशेखरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला असून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.