नाना पटोले यांची सध्या अवस्था खूप वाईट; आकाश फुंडकरांचा पलटवार
“भाजपा हा जातीवादी पक्ष आहे. नेहमीच जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम भाजप हा पक्ष करत असतो,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या आरोपांना यांच्या आरोपांवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी निशाणा साधला आहे. “नाना पटोले यांची सध्या अवस्था खूप वाईट आहे. काँग्रेसने त्यांना कुठल्याही पदावर ठेवलेले नाही आहे. काय करावं, हे त्यांना सुचत नाहीये, पण जाती-जातीमध्ये भांडण लावायचे आणि आपण त्याचा फायदा उचलायचा, ही काँग्रेसची ही पॉलिसी आहे. त्यामुळे इलेक्शनच्या तोंडावर ते असे काहीतरी बडबडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींच पॅकेजमध्ये फक्त आकडे फुगवण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीही दिसत नाही. अशी टीका केली होती. त्यावरही फुंडकर यांनी निशाणा पलटवार केला आहे. “सामना पेपर लिहिणारे संजय राऊत किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील यांना कधीच यांना जीआर व सरकारी आकडे कधीच समजले नाहीत, म्हणून ते सरकारही चालू शकले नाहीत, ते त्यांच्या आमदारांचा आकडा ही टिकवू शकले नाही. आज तो आकडा आमच्यासोबत सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी सर्वात आधी घरी बसून आकड्यांचा अभ्यास करावा आणि नंतर त्यावर बोलावे घरी बसून त्याचा अभ्यास करावा व नंतर त्यावर बोलावे.
मुंबई विमानतळाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका मोठ्या नेत्याचे नाव देण्याचा डाव भाजपने आखला आहे. असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना फुंडकर म्हणाले की,’रोहित पवार यांची इच्छा असेल की त्यांचं नाव द्यावं. ते काहीही बोलतील त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं असं मी समजत नाही. वेळ आल्यावर त्या विमानतळाला ज्यांचं नाव दिलं पाहिजे तेच नाव तिला दिलं जाईल. जी लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे शासन निर्णय करेल व चांगल्या व्यक्तीचं नाव तिथे दिले जाईल.”
नवी मुंबईच्या विमानतळाला नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जाणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांना दिवस-रात्र उठता बसता नरेंद्र मोदीं शिवाय काही दिसत नाही. त्यांना आता पश्चाताप होत असेल की, आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिलो असतो तर त्या दिवशी विमानतळाच्या उद्घाटनाला त्यांचे नेते उद्धव ठाकरे हेदेखील राहिले असते. त्यामध्ये त्यांना हे भाषण करता आले असते की, ही विमानतळ घडवण्यामध्ये माझाही थोडाफार हिस्सा आहे. त्यामुळे आता कशातच काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना सर्वच ठिकाणी मोदी दिसायला लागले आहेत.” अशी खिल्लीही फुंडकर यांनी उडवली.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आरएसएसचे सरसंघचाल मोहन भागवत यांच्यावर आरोप केला होता. मोहन भागवत म्हणतात की आम्हाला जातिवाद संपवायचा आहे मात्र तरी त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा भागवत कुठेही दिसत नाहीत. या आरोपांवर बोलताना आकाश फुंडकर म्हणाले, ‘ओवेसी आणि त्यांचा परिवार हे एका पागल कुत्र्यासारखे आहेत, आपण त्यांचे भाषण करताना सर्वांनी अनुभवलं आहे. हे दोघेही भाऊ ज्वलंत भाषण करणारे आहेत त्यांची पार्टी आहे. ते ओवेसी काय बोलतील त्यामुळे त्यांचा काही नेम नाही. त्यामुळे त्यांनी सुर्यावर थुंकल्यासारख करू नये. मोहन भागवत हे सूर्यासारखे तेजस्वी व्यक्ती आहेत. त्यांचं देशाला एकत्रित बांधण्यासाठी खूप मोठा रोल आहे. त्यामुळे त्यांची मोहन भागवतांवर बोलायची लायकी नाही.”
काल ( ११ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. त्यावरही आकाश फुंडकर यांनी निशाणा साधला आहे. “मी मागेही बोललो होतो उद्धव ठाकरे हे रस्त्यावर आले. त्यामुळे त्यांची मी अभिनंदन करतो. जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांच्या हातात सत्ता होती, महाविकास आघाडी होती. आज घराच्या बाहेर निघाले आहे व ते रस्त्यावर येत आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजबद्दल बोलताना फुंडकर म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटी रुपयांचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी दिलं आहे. असं पॅकेज इतिहासात कुठल्याही सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने पॅकेज दिल्यानंतर शेतकरी आज बिनधास्त झाला आहे.