Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला

Chila Recipe : हिरव्या मुगडाळीचा चिला हा एक परफेक्ट हेल्दी ब्रेकफास्ट पर्याय आहे जो तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा देतो. यात प्रथिने, फायबर आणि खनिजांचा साठा भरपूर आहे, सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट नाश्ता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2025 | 02:14 PM
चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला

चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला

Follow Us
Close
Follow Us:

“भारतीय स्वयंपाकात हिरवी मुगडाळ ही अत्यंत पौष्टिक आणि हलकी डाळ मानली जाते. प्रथिनांनी भरपूर आणि पचायला सोपी असल्यामुळे ती सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी किंवा डाएट प्लॅनमध्ये नेहमीच उत्तम पर्याय ठरते. अनेकदा लोकांना डाळींचे पदार्थ म्हणजे फक्त आमटी, खिचडी किंवा डाळ-भात एवढेच माहीत असते. पण या साध्या हिरव्या मुगडाळीपासून तयार होणारा “चिला” हा एक स्वादिष्ट, झटपट आणि हेल्दी पर्याय आहे.

Anjeer Barfi : गोड पदार्थाने वाढवा सणाचा गोडवा, दिवाळीनिमित्त घरी बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ‘अंजीर बर्फी’

हिरव्या मुगडाळीचा चिला हा उत्तर भारतातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे, जो आता महाराष्ट्रातही लोकप्रिय झाला आहे. हा डोश्यासारखा पण किंचित जाडसर असतो. या चिल्यात डाळ, मसाले आणि थोडीशी भाजी वापरल्यामुळे तो प्रथिन, फायबर आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध बनतो. विशेष म्हणजे हा पदार्थ तळलेला नसल्यामुळे तो तेलकट न वाटता हलका आणि पोटभर जेवण देणारा असतो. जर तुम्ही सकाळी काही हेल्दी पण स्वादिष्ट बनवायचा विचार करत असाल, तर ही हिरव्या मुगडाळीचा चिला रेसिपी नक्की करून पाहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • हिरवी मुगडाळ – १ कप
  • आलं – १ इंच तुकडा
  • लसूण – ३ ते ४ पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या – २ (चवीनुसार कमी-जास्त)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून बारीक चिरलेली
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला, ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • जिरे – ½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • पाणी – डाळ भिजवण्यासाठी आणि वाटण्यासाठी
  • तेल / तूप – शेकण्यासाठी
Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा ‘अंजीर हलवा’; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम हिरवी मुगडाळ स्वच्छ धुऊन ४-५ तास (किंवा रात्रभर) पाण्यात भिजत ठेवा.
  • भिजलेली डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये घ्या. त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडं पाणी घालून थोडी घट्ट पण गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • ही पेस्ट एका भांड्यात काढा. त्यात मीठ, हळद, जिरे, कोथिंबीर आणि कांदा घाला. सर्व छान एकत्र करा. जर
  • मिश्रण खूप घट्ट असेल तर थोडं पाणी घालून डोश्यासारखं बॅटर तयार करा.
  • नॉनस्टिक तवा किंवा लोखंडी तवा गरम करा. त्यावर थोडं तेल लावा.
  • एक मोठा चमचा बॅटर तव्यावर ओता आणि गोलाकार पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तेल सोडून शेकून घ्या.
  • तयार चिला प्लेटमध्ये काढा आणि गरमागरम चटणी, दही किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • बॅटर फार पातळ करू नका, नाहीतर चिला पसरताना फाटेल.
  • चिल्यात बारीक किसलेली गाजर, पालक किंवा ढोबळी मिरची घातल्यास चव आणि पौष्टिकता वाढते.
  • वजन कमी करण्यासाठी तेलाऐवजी तव्यावर थोडं तूप वापरा.

Web Title: Tasty and nutritious make green moong dal chila for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Healthy Breakfast
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी
1

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी
2

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

हाडे मजबूत करून… कर्करोगाचा धोकाही कमी करते पालक; भाजी नाही यंदा बनवा गरमा गरम ‘पालक डाळ’
3

हाडे मजबूत करून… कर्करोगाचा धोकाही कमी करते पालक; भाजी नाही यंदा बनवा गरमा गरम ‘पालक डाळ’

एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास ‘चिकन खीमा’ रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा
4

एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास ‘चिकन खीमा’ रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.