IRCTC Tour Package : भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कूर्गची २ रात्री ३ दिवसांची खास सहल. निसर्गरम्य डोंगर, कॉफी बागा आणि धबधब्यांचा आनंद एसी प्रवास, हॉटेल व नाश्त्यासह आकर्षक दरात घ्या.
(फोटो सौजन्य: istock)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
भारतात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
भारतातील स्कॉटलँड म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
IRCTC तुमच्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे.
भटकंतीची आवड असलेले लोक नेहमीच नवीन ठिकाणांच्याशोधात असतात. तुमच्याही मनात कूर्गच्या हिरव्यागार दऱ्या-खोऱ्यांत फिरण्याचं स्वप्न आहे का? आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी भारतीय रेल्वे देत आहे. कर्नाटक राज्यातील कूर्ग हे निसर्गरम्य हिल स्टेशन असून त्याला “भारताचे स्कॉटलंड” अशीही ओळख आहे. हिरवेगार डोंगर, विस्तीर्ण कॉफीच्या बागा, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. एबी फॉल्स, दुबारे हत्ती कॅम्प आणि राजा सीट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. निसर्गप्रेमींसाठी कूर्ग हे आदर्श पर्यटनस्थळ मानले जाते. या टूर पॅकेजची तिकिटे भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.