सायलेंट हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा गमवावा लागेल जीव
हार्ट अटॅक येण्याची कारणे?
सायलेंट किलर हार्ट अटॅक का येतो?
हार्ट अटॅकची लक्षणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशभरात हार्ट अटॅक हा अतिशय गंभीर आजार मानला जातो. कारण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. दरवर्षी सुमारे 8,05,000 हार्ट अटॅक येतो, तर पहिल्यांदा हार्ट अटॅक येणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 6,05,000 आहे आणि 2,00,000 लोकांना पुन्हा एकदा हार्ट अटॅक आल्याचे दिसून आले आहे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या चरबीयुक्त पदार्थामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानंतर हृदयाची धडधड थांबते. योग्य उपचार न मिळाल्यास कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष ना करता वेळीच उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. याशिवाय अचानक येणे, डोकं हलके वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे हे हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी शरीरात दिसून येते. तसेच आजूबाजूच्या गोष्टी फिरल्यासारख्या वाटू लागल्यास कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला द्यावा आणि उपचार करावेत.
हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होतो. व्यायाम करताना धाप लागणे, शारीरिक हालचाली न करता लगेच थकून जाणे किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना वारंवार दम लागत असेल तर ही सामान्य लक्षणे नाहीत. हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी ही लक्षणे दिसून येतात.
व्हिटॅमिन D ची कमतरता थायरॉईड कर्करोगाचा धोका वाढवते का? तज्ज्ञ काय सांगतात
पोटासंबंधित होणारा त्रास हा कायमच हृदयाच्या आजाराशी जोडलेला नसतो. पण सतत तुम्हाला उलट्या किंवा मळमळ, ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. काहीवेळा हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नसतील तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या छोट्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.






