दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी 'हे' तेल आहे सर्वोत्तम
हृदय निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणते तेल फायदेशीर?
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते तेल चांगले?
तेलाचे अतिसेवन करण्याचे तोटे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, जंक फूड इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर वेगवेगळ्या आजारांची लागण होऊ शकते. खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे हृदयावर परिणाम होतो. याशिवाय स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे सुद्धा आरोग्य बिघडून जाते. आपल्यातील अनेकांना कायमच तिखट, तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. पण यामुळे शारीरिक आरोग्य परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात खाल्लेल्या या तेलामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
जेवण बनवताना तेल लागतेच. तेलाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. भाजी, पोळी, डाळ किंवा कोणताही पदार्थ बनवताना तेलाचा वापर केला जातो. पण चुकीच्या तेलाचा वापर केल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक जमा होऊन रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. प्रत्येक वेगवेगळ्या तेलामध्ये फॅट्स आणि इतर घटकांचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे तेलाची निवड विचारपूर्वक करावी. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे हृद्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य तेलाची निवड करावी.
एखाद्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असेल तर या तेलाच्या सेवनामुळे शरीरातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाला हानी पोहचते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीच्या गाठी तयार होतात. तेलामध्ये असणारे ट्रान्स फॅट शरीरासाठी खूप जास्त खराब मानले जाते. ट्रान्स फॅट शरीरातील सूज वाढवून रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतात. यामुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. अनसॅच्युरेटेड फॅट शरीरासाठी चांगले मानले जातात.
संपूर्ण शरीर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल खूप जास्त फायदेशीर मानले जाते. मोहरीच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय त्यात एरुसिक ॲसिड सुद्धा असते. मोहरीच्या तेलामध्ये अलाइल आयसोथायोसायनेट नावाचे घटक असतात. शरीरात वाढलेले खराब बॅक्टरीया नष्ट करण्यासाठी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा.
तेलाचा वापर करताना एक महिना मोहरीचे तेल, एक महिना ऑलिव्ह ऑइल तर एक महिना राइस ब्रान तेल अशा तेलांचा वापर करावा. यामुळे शरीराला आवश्यक असलेले गुड फॅट्स मिळतात. जेवण बनवताना ५ ते ६ चमच्यांपेक्षा जास्त तेलाचा वापर करू नये. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य त्या तेलाचा वापर करावा.
Ans: होय. संतृप्त चरबी (saturated fat) आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे किंवा तेलांचे अतिसेवन LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल वाढवू शकते.
Ans: ऑलिव्ह, कॅनोला, शेंगदाणा, सूर्यफूल किंवा मोहरीसारखी असंतृप्त चरबीयुक्त तेले योग्य प्रमाणात वापरता येतात. कोणते तेल सर्वोत्तम आहे हे एकाच पर्यायावर अवलंबून नसून संपूर्ण आहारावरही ठरते.
Ans: नाही. तेलासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि धूम्रपान टाळणे यांसारख्या जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत.






