ओठांवरील मऊपणा वाढवण्यासाठी 'हे' घरगुती पॅक ठरतील प्रभावी, थंडगार वातावरणात ओठ राहतील कायमच गुलाबी
चेहऱ्यावरील अतिशय नाजूक अवयव म्हणजे ओठ. सर्वच महिलांना चमकदार आणि गुलाबी ओठ हवे असतात. ओठ सुंदर दिसण्यासाठी ओठांवर वेगवेगळे लिपबाम, लिपमास्क इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण तरीसुद्धा ओठ चांगले दिसत नाहीत. ओठांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सर्वच महिला आणि मुली कायमच लिपस्टिक लावतात. पण वारंवार लिपस्टिक लावल्यामुळे ओठ अतिशय कोरडे आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच ओठ सुद्धा कोरडे पडतात. ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे ओठांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या ओठांवरील त्वचा हाताने काढल्यास ओठांमधून रक्त येण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये ओठांमधील ओलावा कमी होऊन जातो आणि ओठ अतिशय कोरडे पडतात.(फोटो सौजन्य – istock)
ओठांचे खरे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर किंवा इतर महागड्या प्रॉडक्टचा वापर कारण्याऐवजी घरगुती उपाय करून ओठांची काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांमध्ये सुकलेल्या ओठांमुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते. त्यामुळे थंडीत शरीरातील उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात ओलावा टिकून राहतो. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये ओठ कायमच गुलाबी ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय त्वचा आतून हायड्रेट आणि गुलाबी ठेवतात.
भारतीय स्वयंपाक घरात तूप हा पदार्थ कायमच उपलब्ध असतो. तुपाचा वापर करून जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. शिरा, शेवयांची खीर, लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. ओठ कोरडे पडल्यानंतर रात्री झोपण्याआधी ओठांना तूप लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते. तुपामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि फॅटी ऍसिड आढळून येतात,ज्यामुळे ओठांवर दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. यामुळे फाटलेली त्वचा सुधारते आणि ओठांवर चमक येते.
ओठांवर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. यामुळे ओठांमधून रक्त येणे, ओठ फाटणे, ओठांवरील त्वचा निघणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याचे तेल ओठांवर लावावे. दिवसभरात चार ते पाच वेळा ओठांवर खोबऱ्याचे तेल लावून हलकासा मसाज केल्यास डेड स्किन कमी होण्यास मदत होईल.
ओठांसाठी अतिशय प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे गुलाबपाणी. गुलाबपाणी त्वचा आणि केसांसाठी सुद्धा वापरला जातो. गुलाब पाण्यात असलेले गुणधर्म ओठ अतिशय मऊ आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात. कापसाच्या गोळ्यावर गुलाबी पाणी घेऊन ओठांवर लावावे. त्यानंतर रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या. यामुळे ओठ गुलाबी राहतात.