Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Blood Pressure वाढवण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गंभीर चुका! तरुण वयातच घ्याव्या लागतील उच्च रक्तदाबाच्या गोळ्या

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 08:29 AM
High blood pressure वाढवण्यास कारणीभूत ठरतात 'या' गंभीर चुका! तरुण वयातच घ्याव्या लागतील उच्च रक्तदाबाच्या गोळ्या

High blood pressure वाढवण्यास कारणीभूत ठरतात 'या' गंभीर चुका! तरुण वयातच घ्याव्या लागतील उच्च रक्तदाबाच्या गोळ्या

Follow Us
Follow Us:

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
जीवनशैलीत कोणत्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक?

तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर लोकांमध्ये उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे अतिशय तीव्र होतात आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मेंदूच्या नसांवर जास्तीचा तणाव येतो आणि मेंदूच्या नसा फाटण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे.(फोटो सौजन्य – istock)

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

जीवनशैलीतील कोणत्या चुकांमुळे उच्च रक्तदाब वाढतो:

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जास्त मीठ, तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमची पातळी झपाट्याने वाढू लागते. वाढत्या सोडियमचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. त्यामुळे आहारात कायमच सात्विक आणि पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य कायमच निरोगी राहण्यास मदत होते.

हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे मानसिक तणावात झपाट्याने वाढ होत आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी मानसिक तणाव घेऊन आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त तणाव घेतल्यास मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची शक्यता असते.

सततच्या कामाच्या धावपळीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. शारीरिक हालचालींचा अभाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, व्यायाम न करणे किंवा चालण्याची सवय नसणे इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे रक्तभिसरण व्यवस्थित होत नाही. यामुळे शरीरात उच्च रक्तदाब वाढतो. तसेच शारीरिक हालचालींचा शरीरात अभाव निर्माण झाल्यामुळे झपाट्याने वजन वाढणे किंवा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.

सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

झोपेची कमतरता, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण, अनियमित झोपेची सवय इत्यादी गोष्टींमुळे शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही. विश्रांतीच्या अभावामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी, अनुवंशिकता, मधुमेह इत्यादी आजारांमुळे सुद्धा शरीरात उच्च रक्तदाब वाढतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुण वयात हाय ब्लड प्रेशर का वाढतो?

    Ans: जास्त मीठाचे सेवन, फास्ट फूड, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, धूम्रपान आणि मद्यपान ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: कोणत्या चुका BP वाढवण्यास कारणीभूत ठरतात?

    Ans: जंक फूड खाणे, मीठ जास्त घेणे, नियमित व्यायाम न करणे, सतत तणावात राहणे आणि वजन वाढणे या सवयी BP वाढवतात.

  • Que: हाय ब्लड प्रेशर टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: संतुलित आहार घ्या, मीठ कमी करा, नियमित व्यायाम करा, ताणतणाव कमी ठेवा आणि पुरेशी झोप घ्या.

Web Title: These serious mistakes cause to increase high blood pressure high blood pressure pills should be taken at a young age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.