Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवीच्या रंगात कायमच बदल जाणवतो? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

किडनी स्टोन झाल्यानंतर पाठीत वेदना, लघवीच्या रंगात बदल इत्यादी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 05:30 AM
लघवीच्या रंगात कायमच बदल जाणवतो? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

लघवीच्या रंगात कायमच बदल जाणवतो? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

किडनी स्टोन होण्याची कारणे?
किडनी स्टोन झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
किडनी स्टोन कशामुळे होतो?

किडनी हा शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे इत्यादी असंख्य कामे किडनी करते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे कालांतराने शरीरात किडनी स्टोन तयार होतो. किडनीसंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे खूप जास्त तीव्र होतात आणि शरीराला हानी पोहचवतात. किडनी स्टोन झाल्यानंतर छोटे छोटे खड्डे मूत्रमार्गात जमा होतात. हे खडे काहीवेळा लघवीवाटे बाहेर पडून जातात तर काहीवेळा शरीरात तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)

पोट आणि आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘हे’ योगासन, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. पण काहीवेळा किडनीच्या आजारांची लागण झाल्यानंतर घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. कॅल्शिअम, सोडिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अ‍ॅसिड इत्यादी जमा झालेल्या घटकांमुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते. यामुळे मूत्रमार्गात बारीक बारीक खडे तयार होतात. चला तर जाणून घेऊया किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती.

किडनी स्टोन झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटात वेदना होणे:

किडनी स्टोन झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. मूत्रमार्गात खडे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात. पाठीत, बरगड्यांखाली आणि पोटाच्या खालच्या भागात खूप जास्त तीव्र वेदना जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

लघवी करताना जळजळ होणे:

मूत्रमार्गात वाढलेल्या खड्यांमुळे लघवी करताना जळजळ आणि वेदना होते. याला वैद्यकीय भाषेत डिस्युरिया असे म्हणतात. कमी पाण्याच्या सेवनामुळे मूत्रमार्गात वाढलेले खडे अडकून पडण्याची जास्त शक्यता असते. पण कायमच मूत्रमार्गात जळजळ आणि तीव्र वेदना होत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

‘हॅबिल्ड’चा ऐतिहासिक 10 वा जागतिक विक्रम; ‘हर घर योगा’ला अभूतपूर्व प्रतिसाद

लघवीच्या रंगात बदल:

निरोगी शरीरातील लघवीचा रंग स्वच्छ किंवा फिकट पिवळा असतो. पण मूत्रपिंडात वाढलेल्या खड्यांमुळे लघवीचा रंग बदलण्याची जास्त शक्यता असते. लघवी गुलाबी, लाल किंवा गडद तपकिरी रंगाची दिसू लागते. तर काहीवेळा लघवीतून रक्त येण्याची खूप जास्त शक्यता असते. लघवीतून रक्त किंवा कायमच लघवीच्या रंगात बदल दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लघवीच्या रंगात बदल होणे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते का?

    Ans: काही वेळा लघवीचा रंग बदलणे हे शरीरातील पाणी कमी होणे, संसर्ग किंवा किडनीशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकते. किडनी स्टोन असल्यासही काही लोकांमध्ये लघवीत बदल जाणवू शकतात.

  • Que: किडनी स्टोनची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: कंबरेच्या किंवा पाठीच्या बाजूला तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, लघवीत रक्त येणे, वारंवार लघवी होणे, मळमळ किंवा उलटी अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: किडनी स्टोन होण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: कमी पाणी पिणे, आहारातील काही घटकांचे असंतुलन, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे आणि काही आरोग्य समस्या यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.

Web Title: These serious symptoms appear in the body after developing kidney stones do not ignore them under any circumstances

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.