Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाय आणि कंबर सतत दुखते? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2025 | 08:45 AM
पाय आणि कंबर सतत दुखते? किडनीसंबंधित असू शकतात 'हे' गंभीर आजार

पाय आणि कंबर सतत दुखते? किडनीसंबंधित असू शकतात 'हे' गंभीर आजार

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे सेवन, पचनाच्या समस्या, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी अतिशय महत्वाची ठरते. पण किडनीच्या कार्यात अडथळे आल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)

निर्जीव नसांना जिवंत करतो घरातील हा एक मसाला, Weak Nerves असणाऱ्या लोकांना आजपासूनच आहारात करा याचा समावेश

किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर हातापायांमध्ये वेदना होणे किंवा कंबर दुखणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर बऱ्याचदा किडनी स्टोनची समस्या उद्भवतात. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात अतिशय तीव्र वेदना होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

किडनी स्टोन म्हणजे काय?

किडनी स्टोन झाल्यानंतर छोटे छोटे खड्डे मूत्रमार्गात जमा होण्यास सुरुवात होते.हा स्टोन हळूहळू लघवीद्वारे बाहेर पडून जातील. मूत्रमार्गात जमा झालेले स्टोन बाहेर पडून जाताना खूप जास्त वेदना होतात. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर किडनीमधील स्टोन बाहेर पडून जात नाहीत, ज्यामुळे लघवी करताना वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. याशिवाय बऱ्याचदा किडनी स्टोन तोडून किंवा सर्जरी करून काढावा लागतो. किडनीमध्ये मिनरल्स, ऍसिड आणि सॉल्ट एकत्र मिळून किडनी स्टोन तयार होतात. सुरुवातीला हे स्टोन अतिशय लहान लहान कण असतात, मात्र हळूहळू हे स्टोन मोठे होतात आणि मूत्रमार्गात अडथळे निर्माण करतात.

किडनी स्टोनची लक्षणे:

  • कंबर, पोट किंवा ओटीपोटात वेदना
  • मांड्या आणि पायांमध्ये वेदना
  • उलटी येणे
  • लघवीतून रक्त येणे
  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना
  • वारंवार लघवी होणे
  • ताप येणे किंवा थंडी वाजणे
  • लघवीमधून दुर्गंधी

किडनी स्टोन होण्याची कारणे:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. यामध्ये मिनरल्स, अ‍ॅसिड आणि इतर अनेक घटक आढळून येतात. कॅल्शिअम, सोडिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अ‍ॅसिड शरीरात जमा झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे किडनी स्टोन होतो. शरीरात सर्व घटक एकत्र मिक्स झाल्यानंतर मूत्रमार्गात बारीक बारीक खडे होतात.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे उद्भवतील गंभीर आजार! रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

FAQs (संबंधित प्रश्न)

किडनी स्टोन म्हणजे काय?

किडनी स्टोन (मुतखडा) म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षारांचे लहान गोळे तयार होणे. हे दगड मूत्रमार्गातून लघवीवाटे बाहेर पडतात, ज्यामुळे वेदना होऊ शकतात.

किडनी स्टोनची लक्षणे कोणती?

पाठीत आणि बाजूला तीव्र वेदना.लघवीचा रंग बदलणे किंवा लघवी करताना जळजळ होणे.मळमळ, उलट्या आणि ताप.

किडनी स्टोन कसे टाळता येतात?

भरपूर पाणी प्या आणि दररोज २-३ लिटर द्रवपदार्थ सेवन करण्याचे लक्ष्य ठेवा. मिठाचे सेवन कमी करा आणि सोडियम-समृद्ध, ऑक्सलेट-समृद्ध पदार्थ टाळा. तुम्हाला किडनी स्टोनचा धोका असल्यास, डॉक्टरांना भेटून योग्य मार्गदर्शन घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear in the body after kidney stones be careful in time health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney stones

संबंधित बातम्या

वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
1

वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका
3

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल
4

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.