हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे उद्भवतील गंभीर आजार!
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असणे अतिशय महत्वाचे आहे. हिमोग्लोबिन शरीरातील अनेक महत्वपूर्ण कामे करते. पण बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय सर्वच लहान मोठ्या अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी हिमोग्लोबिन अतिशय महत्वाचे आहे. पण खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार गुडघे दुखतात? गुडघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम
शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर वारंवार डोकं दुखणे, अशक्तपणा, थकवा, दमा, चक्कर येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. अनियमित जीवनशैली, महिलांमध्ये मासिक पाळीतील अतिरक्तस्त्राव, गर्भधारणा, दीर्घकालीन आजार, अपचन इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील.
हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्या आणि वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. पालेभाज्यांमध्ये असलेले घटक शरीराला योग्य पोषण देतात. मेथी, पालक, लालमाठ, मोहरी इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आठवड्यातून तीनदा किंवा नियमित पालेभाज्यांचे सेवन केल्यास आजारांपासून शरीर दूर राहील. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.
नियमित सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. डाळिंब किंवा सफरचंद नियमित खाल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. याशिवाय खजूर, मनुका, जांभूळ, गूळ,तीळ, संत्री, मोसंबी, लिंबू इत्यादी विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघेल.
शरीर कायम निरोगी ठेवण्यासाठी शांत झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते. यासोबतच सकाळी उठल्यानंतर नियमित ध्यान, प्राणायाम किंवा योगासने केल्यास शरीर दीर्घकाळ आजारांपासून दूर राहील. तसेच संतुलित आहार, भरपूर पाणी आणि योग्य विश्रांती घेतल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
हिमोग्लोबिन म्हणजे काय?
हिमोग्लोबिन (Hb) हे लाल रक्तपेशींमधील एक प्रथिन आहे, ज्याचे मुख्य कार्य शरीरातील पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणे आहे. हे फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीरात वितरित करते.
कमी हिमोग्लोबिनची कारणे?
लोहासारख्या आवश्यक घटकांची कमतरता ही हिमोग्लोबिन कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे.लाल रक्तपेशी तयार होण्याच्या क्षमतेवर परिणाम करणारी कोणतीही परिस्थिती हिमोग्लोबिन कमी करू शकते.
कमी हिमोग्लोबिनची लक्षणे:
सतत थकवा येणे आणि अशक्तपणा, फिकट त्वचा, धाप लागणे, चक्कर येणे आणि डोके दुखणे, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होणे.