Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस चमकदार सुंदर होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 09:45 AM
पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

Follow Us
Follow Us:

हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच केसांच्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा तर काहीवेळा टाळूवर वाढलेल्या इन्फेक्शनमुळे केसांच्या समस्या वाढत जातात. केस पातळ आणि कमकुवत झाल्यानंतर केसांची वाढ पूर्णपणे थांबते आणि लवकर नवीन केस येत नाहीत. केसांच्या समस्या वाढल्यानंतर सर्वच महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा आणि हेअर ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे केस काहीकाळच अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने केसांच्या समस्या पुन्हा एकदा वाढण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील बदल, मानसिक तणाव आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर केसांच्या समस्या खूपच वाढत जातात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या पदार्थांचा वापर करून घरीच हेअर सीरम बनवू शकता. हे सीरम केसांच्या मुळांना भरपूर पोषण देईल.(फोटो सौजन्य – istock)

Pimples Before Periods: मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? जाणून घ्या यामागील गंभीर कारणे

केस चमकदार आणि लांबलचक दिसण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे केसांची गुणवत्ता सुधारत नाही. केसांना मजबूत ठेवण्यासाठी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केस गळणे किंवा वारंवार टाळूवर टाळूवर इन्फेक्शन होत असेल तर हा हेअर सीरम नक्की वापरून पहा. यासाठी तुम्ही काळीमिरी, रोजमेरी आणि मेथी दाणे इत्यादी पदार्थ लागतील. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ केसांच्या मुळांना आतून पोषण देण्यास मदत करतात. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस मुळांपासून निघून येत नाहीत.

हेअर सीरम स्प्रे तयार करण्यासाठी सर्वप्रथम टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर काळीमिरी, रोजमेरी आणि मेथी दाणे घालून टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हेअर स्प्रे सकाळी उठल्यानंतर नियमित केसांच्या मुळांवर मारल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रत्येक तीन आठवड्यानंतर हेअर स्प्रे नवीन तयार करावा. ३ महिने नियमित केसांच्या मुळांवर स्वयंपाक घरात नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेला हेअर स्प्रे मारल्यास केस मजबूत आणि चमकदार होतील.

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर सतत खाज येते? मग ‘या’ पद्धतीने करा ताकाचा वापर, कोंडा होईल पूर्णपणे नाहीसा

केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. केसांना नैसर्गिक स्प्रे लावण्यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते आणि केस स्वच्छ होतात. केसांच्या वाढीसाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हेअर सीरम आणि हेअर केअर उपलब्ध आहेत, पण त्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले हेअर स्प्रे किंवा हेअर सीरम वापरावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Thin hair will get plenty of nourishment make hair serum at home using these kitchen ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
4

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.