World Yoga Day 2024
जगभरात सगळीकडे २१ जून ला जागितक योग दिवस साजरा केला जातो. या दिवशी सगळीकडे योग कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील सर्व लोकांना व्यायाम आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. स्त्री पुरुषांचे वाढत चालेले वय. वय वाढल्यानंतर हळूहळू आजारपण सुद्धा वाढत जात. वयाच्या तिशीनंतर महिलांच्या आरोग्यामध्ये अनेक बदल होतात. हार्मोनल बदलांमुळे महिलांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी योग्य तो आहार घेऊन व्यायाम करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक व्यायाम आणि योगाबाबत जागरूक झाले आहेत. वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही योगाचे किंवा व्यायाम करू शकता. ज्याचा फायदा तुम्हाला नेहमीच होईल. आज आम्ही तुम्हाला जागतिक योग दिनानिमित्त रोजच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी महिलांनी कोणती योगासने करावी, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
महिलांच्या आरोग्यासाठी बालासन अतिशय फायदेशीर आहे. याला ‘चाईल्ड पोज’ असे देखील म्हणतात. नेहमी बालासन केल्याने महिलांच्या आरोग्यावर त्याचे सकारत्मक परिणाम होतील. यामुळे पाठदुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी कमी होण्यास मदत होईल. घावपळीच्या जीवनात काही वेळा महिला मानसिक दृष्ट्या तणावामध्ये असतात. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी बालासन करावे.
भुजंगासन हे आसन हे सगळ्यांसाठी प्रभावी आहे. हे आसन नियमित केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. मासिक पाळीमधील वेदना, कंबर दुखी, पाठदुखी इत्यादी अनेक समस्या दूर करण्यासाठी भुजंगासन उपयुक्त आहे. वयाच्या तिशीनंतर सर्वच महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
शरीरातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक महिला त्रस्त झाल्या आहेत. वजन कमी करायचे असल्यास तुम्ही धनुरासन करू शकता. यामुळे हळूहळू वजन कमी होईल. वरील सर्व आसन नियमित केल्याने शरीर योग्य स्थितीमध्ये राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.