Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
ढाका : बांगलादेशातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गुरुवारीच (दि.१२) संपूर्ण देशभरात मतदान झाले. १३ व्या संसदीय निवडणुकीसाठी २९९ जागांसाठी मतदान झाले. आता या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. निकालांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यानुसार, आता तारिक रहमान हे बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, हे स्पष्ट झाले आहे.






