डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
राज्यभरात लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. देवीची मनोभावे पूजा करून नऊ दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्या देवीला दाखवला जातो. तसेच अनेक ठिकाणी गरबा, दांडियांचे आयोजन केले जाते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये सर्वच महिला आणि मुलींना सुंदर दिसायचं असत. पण डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याचे सौदंर्य कमी होऊन जाते. अपुऱ्या झोपेचे परिणाम आरोग्यासोबतच डोळ्यांवर सुद्धा दिसून येतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवापूर्वी डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला जर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
त्वचेवरील सर्वच समस्यांसाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. त्वचेवर आलेले डाग, फोड , पिंपल्स घालवण्यासाठी कोरफड जेल वापरले जाते. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार मिश्रण डोळ्यांच्या खाली लावून १५ मिनिटं ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: वयानुसार जास्तीत जास्त किती पाणी प्यावं जाणून घ्या..
काकडीमध्ये असलेल्या पाण्याचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही काकडीच्या तुकड्यांच्या वापर करू शकता. यासाठी काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवा. हे तुकडे २० मिनिटं डोळ्यांवर ठेवून नंतर काकडीचा तुकडा घेऊन डोळ्यांखाली मसाज करा. यामुळे तुमच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ निघून जाण्यास मदत होईल.
त्वचेवरील डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर केला जातो. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेला रंग उजळण्यास मदत होते. बटाट्याचा ताजा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाच्या गोळ्याने बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावा. १५ मिनिटं झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या. यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: रात्री गुलाब पाण्यात ही 1 गोष्ट मिसळा, सुरकुत्या कमी होतील
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला गुलाब पाणी वापरतात. गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. गुलाब पाणी डोळ्यांना लावल्यामुळे डोळे शांत होतात. तसेच डोळ्याभोवतीची सूज आणि काळपटपणा कमी होण्यास मदत होते.