Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

Hair Care Tips: केसांची हेअरलाईन मागे गेल्यानंतर कपाळावर टक्कल दिसू लागते. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया हेअरलाईन मागे जाण्याची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2026 | 10:04 AM
समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची 'ही' आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची 'ही' आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि मजबूत हवे असतात. केसांच्या घनदाट वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे शाम्पू वापरले जातात, तर कधी केस स्मूथ होण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा कपाळाच्या दोन्ही बाजूंनी केस कमी होऊन भांग रुंद दिसू लागतो किंवा पुढच्या बाजूने केसांची घनता कमी होऊन जाते. केसांची हेअरलाईन कमी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारसा बदल दिसून येत नाही, पण कालांतराने केस खूप जास्त विरळ दिसतात आणि कपाळावर टक्कल पडल्यासारखे वाटते. केसांची हेअरलाईन कमी झाल्यानंतर कपाळ मोठे दिसू लागते. त्यामुळे केसांसंबधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

हेअरलाईन कमी होण्याची कारणे:

कपाळाच्या वरच्या बाजूला आणि दोन्ही कानांच्या दिशेने असलेल्या केसांच्यापुढील भागाला हेअरलाईन असे म्हणतात. केस हळूहळू कमी होऊन केसांची रेषा मागे सरकू लागते. काहींच्या कपाळावरील केस कमी होतात तर काहींचा भांग कमी होऊन अरुंद दिसू लागतो. ही समस्या केवळ महिलांमध्येच नाहीतर पुरुषांमध्ये सुद्धा दिसू लागते. प्रत्येकाची हेअरलाईन वेगवेगळी असते. त्यामुळे केस खूप जास्त विरळ झाल्यानंतर मेडिकलमधील कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

हेअरलाईन मागे जाण्यास आनुवंशिकता सुद्धा कारणीभूत असते. कुटुंबातील इतर व्यक्तींमध्ये केस विरळ आणि हेअरलाईन मागे असल्यास घरातील मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हेअरलाईनमध्ये बदल होतात. शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि केसांच्या मुळांची विशिष्ट हार्मोन्सप्रती असलेली संवेदनशीलता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. याशिवाय शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता, थायरॉईडचे विकार, पुरेशा प्रमाणात प्रथिने न मिळणे, कमी वेळात वजन कमी होणे इत्यादी कारणांमुळे सुद्धा केस गळण्याची शक्यता असते. ताप, मोठा आजार, शस्त्रक्रिया, मानसिक ताण आणि अपुरी झोप इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात.

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

शरीरात होणारे बदल, केस खूप जास्त घट्ट बांधणे, वेणी किंवा अंबाडा बांधणे, केस वारंवार ओढले जाणे, केमिकल ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. खूप मोठ्या प्रमाणावर केस गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. केसांची काळजी घेताना केसांच्या मुळांवर तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. केस अतिशय सैल बांधावेत. केस सरळ करण्यासाठी किंवा कुरळे करण्यासाठी कमीत कमी उष्णता असलेल्या यंत्राचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: समोरून टक्कल पडून हेअरलाईन मागे जाण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: आनुवंशिकता, हार्मोन्समधील बदल, पुरुषांमध्ये आढळणारे पॅटर्न बाल्डनेस, काही पोषक घटकांची कमतरता, ताणतणाव आणि काही वैद्यकीय समस्या यांमुळे केस विरळ होऊ शकतात.

  • Que: हेअरलाईन मागे जाण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: कपाळाच्या दोन्ही बाजूंनी केस कमी होणे, हेअरलाईन हळूहळू मागे जाणे, केसांचा घनपणा कमी होणे आणि टाळू अधिक दिसू लागणे ही संभाव्य लक्षणे आहेत.

  • Que: केस विरळ होण्यामागे आनुवंशिकता कारणीभूत असते का?

    Ans: होय. आनुवंशिकतेमुळे होणारे केसगळतीचे प्रमाण पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळे असू शकते. पुरुषांमध्ये याचा परिणाम अनेकदा कपाळाजवळील हेअरलाईनवर दिसतो.

Web Title: Hair care tips is your hairline receding leaving you bald at the front here are the reasons for hair thinning sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • Healthy Hair

संबंधित बातम्या

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
1

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
2

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
3

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच
4

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.