स्कॅल्पची स्वच्छता – दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे स्कॅल्पवरील घाण, घाम आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे स्कीन पोअर्स स्वच्छ होतात आणि केसांची वाढ सुधारते. स्वच्छ स्कॅल्पमुळे केसांची मुळे देखील मजबूत होतात.
केसांना मजबूत आणि दाट बनवते – दह्यामधील प्रोटीन आणि बायोटिन केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि हळूहळू केस अधिक मजबूत व दाट दिसू लागतात. हे कमजोर आणि निर्जीव केसांसाठी रामबाण उपाय म्हणून काम करते.
कोंडा आणि खाज कमी करते – जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोंडा आणि स्कॅल्पला खाज येणे अशा समस्येने त्रस्त असाल, तर दही फायदेशीर ठरू शकते. त्यातील अँटी-फंगल गुणधर्म स्कॅल्पची जळजळ शांत करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.
नैसर्गिक कंडिशनिंग मिळते – दही हे नैसर्गिक डीप कंडिशनर म्हणून काम करते. ड्राय आणि निस्तेज केसांसाठी दही उपयुक्त ठरते. दह्यातील फॅट्स आणि लॅक्टिक अॅसिड केसांना मॉइश्चरायइज्ड करतात.
सर्वप्रथम, एका वाटीत ताजे दही घेऊन ते चांगले फेटून घ्या. तुमच्या इच्छेनुसार, त्यात मध, लिंबाचा रस, अंडे किंवा केळे घालून तुम्ही हेअर पॅक तयार करू शकता. आता, कोमट पाण्याने केस ओले करा. तयार केलेले मिश्रण स्कॅल्पपासून ते संपूर्ण केसांवर व्यवस्थित लावा. ते केसांवर १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, सौम्य शॅम्पूने केस धुवा.
Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी






