
हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा 'या' लोहयुक्त शक्तिशाली पदार्थांचे सेवन, झपाट्याने वाढेल रक्त
रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय?
स्वयंपाक घरातील कोणते पदार्थ रक्त वाढवतात?
निरोगी राहण्यासाठी शरीराला ज्याप्रमाणे अन्नपाण्याची आवश्यकता असते तशीच आवश्यकता रक्ताची सुद्धा असते. बदलेले वातवरण, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, झोपेचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. चुकीच्या आहारामुळे शरीरात रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होणे हे अतिशय सामान्य वाटत असले तरीसुद्धा शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. महिलांसह पुरुषांच्या शरीरात सुद्धा पोषक घटकांचा अभाव निर्माण झाला आहे. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. रक्त वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्यांची चव अतिशय विचित्र लागते. त्यामुळे स्वयंपाक घरातील हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करून हिमोग्लोबिन वाढवावे. चला तर जाणून घेऊया रक्त वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध
दैनंदिन आहारात आठवड्यातून दोनदा पालकच्या भाजीचे सेवन करावे. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. पण पालकमध्ये असलेले संपूर्ण शरीराला मिळत नाही. त्यामुळे पालकसोबतच लिंबाचे सुद्धा सेवन करावे. पालकाच्या भाजीमध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिक्स करून खाल्ल्यास शरीरात झपाट्याने लोह वाढण्यास मदत होईल.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी आठवड्यातून तीनदा गाजर बीटचा रस प्यावा. यामुळे झपाट्याने रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात नियमित मोसंबीच्या रसाचे सेवन करावे. मोसंबीमध्ये असलेले विटामिन सी शरीराला आवश्यक प्रमाणात लोह देते. त्यामुळे गाजर, बीट आणि मोसंबीचा रस नियमित प्यावा.
World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा
सकाळच्या नाश्त्यात मूठभर चणे आणि थोडस गूळ एकत्र करून खावे. महिनाभर नियमित गूळ आणि चणे एकत्र मिक्स करून खाल्ल्यास शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते तर चण्यांमध्ये प्रोटीन, लोहाचे हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर करणारे आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
Ans: लोहाची कमतरता, पोषणाचा अभाव, जास्त रक्तस्राव, गर्भधारणा किंवा काही आजारांमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.
Ans: पालक, मेथी, बीट, डाळी, खजूर, मनुका, गूळ, डाळिंब आणि अंडी हे लोहयुक्त पदार्थ उपयुक्त ठरतात.
Ans: थकवा, चक्कर येणे, त्वचा फिकट होणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात.