Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Tobacco use awareness Thane survey: जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त ठाणे आणि परिसरात करण्यात आलेल्या किम्स हॉस्पिटलच्या समुदायाधारित सर्वेक्षणात तंबाखू सेवन आणि तोंडाच्या कर्करोगाबाबत जागरूकता असूनही प्रत्यक्ष वर्तनात मोठा फरक असल्याचे समोर आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 05:50 PM
तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
Follow Us
Follow Us:
  • तंबाखूचे 10 पैकी 9 जण करतात सेवन
  • तंबाखूचे धोके माहिती तरीही व्यसन
  • सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त, मार्च ते मे 2026 या कालावधीत महाराष्ट्रातील ठाणे आणि परिसरातील विविध ठिकाणी तंबाखू सेवन आणि तोंडाच्या कर्करोग तपासणीसंदर्भात करण्यात आलेल्या समुदायाधारित सर्वेक्षणातून जागरूकता आणि प्रत्यक्ष वर्तन यामधील मोठी दरी समोर आली आहे. किम्स हॉस्पिटलचे डॉ. हितेश आर. सिंघवी आणि डॉ. अनिल हिरूर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 456 नागरिकांची तपासणी करण्यात आली. मंदिर, मशीद, रेल्वे स्थानके, बँक कर्मचारी, ऑटो-रिक्षा चालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांच्या समुदायांसह विविध सामाजिक घटकांचा यात समावेश होता.

Fitness Tips: जिम, रनिंग किंवा योगा…व्यायामापूर्वी वॉर्म-अप का गरजेचे? जाणून घ्या

सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 77.2 टक्के लोकांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो याची माहिती होती. मात्र, सध्या तंबाखू सेवन करणाऱ्या 162 व्यक्तींमधील 142 जण (87.7 टक्के) धोके माहित असूनही तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळून आले. सोप्या भाषेत सांगायचे तर, तंबाखूचे सेवन करणाऱ्या प्रत्येक 10 पैकी जवळपास 9 जणांना त्याचे दुष्परिणाम माहिती असूनही त्यांनी ही सवय सोडलेली नाही. यावरून केवळ जागरूकता पुरेशी नसून व्यसनाची पकड अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

या अभ्यासात 35.5 टक्के सहभागी सध्या तंबाखू सेवन करत असल्याचे दिसून आले. धूम्रपानापेक्षा धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात आढळले. प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीने सेकंड-हँड स्मोकच्या संपर्कात येत असल्याचे सांगितले. तसेच गेल्या एका वर्षात केवळ 23.5 टक्के लोकांनी तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे फक्त 20.4 टक्के लोकांना तंबाखू सोडण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले होते, ज्यामुळे व्यसनमुक्ती सहाय्य सेवांमधील मोठी कमतरता अधोरेखित झाली.

तोंडाच्या कर्करोग तपासणीत अनेक प्रारंभिक धोक्याची लक्षणे आढळून आली. जवळपास 28 टक्के सहभागींच्या तोंड उघडण्याच्या क्षमतेत घट दिसून आली, जे ओरल सबम्यूकस फायब्रोसिस (OSMF) या संभाव्य कर्करोगपूर्व अवस्थेचे महत्त्वाचे लक्षण आहे. ही स्थिती तंबाखू आणि सुपारीच्या सेवनाशी संबंधित असते. याशिवाय 7.9 टक्के सहभागींच्या तोंडात दीर्घकाळ न बऱ्या होणाऱ्या जखमा आढळल्या. काही व्यक्तींमध्ये ल्युकोप्लाकिया आणि OSMF सारखे कर्करोगपूर्व तोंडातील आजार निदान झाले. या सर्वेक्षणामध्ये 96.7 टक्के सहभागींची तोंडाची तपासणी करण्यात आली, ज्यामुळे समुदायाधारित तपासणी कार्यक्रमांद्वारे उच्च जोखमीच्या व्यक्तींची वेळेवर ओळख पटविण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

तंबाखूचे धोके माहिती तरीही व्यसन

डॉ. हितेश आर. सिंघवी म्हणाले, “या सर्वेक्षणातून मिळालेला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे केवळ जागरूकता म्हणजे कृतीची हमी नाही. बहुतेक तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना धोके माहिती आहेत, परंतु व्यसन ही एक मोठी अडचण आहे. लोकांना तंबाखू सोडण्यासाठी अधिक सक्षम समुपदेशन, व्यसनमुक्ती सहाय्य आणि समुदाय स्तरावरील सहभागाची गरज आहे.”

डॉ. अनिल हिरूर म्हणाले, “तोंडाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईत लवकर निदान हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचारांमुळे विशेषतः उच्च जोखमीच्या गटांमध्ये अनेक जीव वाचवता येऊ शकतात.” ते पुढे म्हणाले, “तोंडाच्या कर्करोगाची नियमित तपासणी दरवर्षी सुमारे 40,000 जीव वाचवू शकते. भारतातील तोंडाच्या कर्करोगाचे वाढते ओझे कमी करण्यासाठी लवकर निदान हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.”

या निष्कर्षांमधून हे स्पष्ट होते की जनजागृती मोहिमांमुळे लोकांमध्ये माहिती वाढली असली तरी त्या ज्ञानाचे दीर्घकालीन वर्तनबदलामध्ये रूपांतर करणे हे पुढील मोठे आव्हान आहे. या जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त संदेश स्पष्ट आहे – धोका माहिती असणे पुरेसे नाही; तंबाखू सोडणेच खऱ्या अर्थाने जीव वाचवते. यावर्षीच्या जागतिक तंबाखूमुक्त दिनाची संकल्पना “Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products” तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या आक्रमक विपणन पद्धतींबाबत आणि तरुणांमध्ये वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करते.

किम्स हॉस्पिटलचे प्रादेशिक संचालक श्री. सौरभ गुप्ता म्हणाले, “व्हेपिंग हे धूम्रपानापेक्षा सुरक्षित आहे असा गैरसमज वाढत आहे. काही व्हेप उपकरणांमधील निकोटीनचे प्रमाण शेकडो सिगारेट्सच्या समतुल्य असू शकते, ज्यामुळे विशेषतः तरुणांमध्ये व्यसनाधीनता आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.” किम्स हॉस्पिटलच्या मते, तंबाखूजन्य कर्करोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम, सहज उपलब्ध व्यसनमुक्ती सेवा आणि नियमित समुदायाधारित तोंडाच्या कर्करोग तपासणी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Web Title: Tobacco use oral cancer survey thane india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Tobacco

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.