Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात
वॉर्म-अप हा कोणत्याही व्यायामाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. वॉर्म-अपमुळे स्नायू अधिक लवचिक बनतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते, त्यामुळे स्नायू ताणणे, लिगामेंटची दुखापत होणे किंवा व्यायामादरम्यान क्रॅम्प येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच हलक्या शारीरिक हालचालींमुळे हृदयाचे ठोके हळूहळू वाढतात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. परिणामी शरीर मुख्य व्यायामासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होते. याशिवाय, वॉर्म-अपमुळे शरीराची प्रतिक्रिया क्षमता, समन्वय आणि ताकद वाढण्यास मदत होते. त्यामुळे धावणे, वजन उचलणे किंवा कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंना अधिक प्रभावी कामगिरी करता येते आणि त्यांचा परफॉर्मन्सही सुधारतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Foods For Mental Health: मूड सुधारण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम






