Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्मीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम आले आहेत? मग उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे आहारात सेवन करावे. उपाशी पोटी एक किंवा दोन पाने चावून खाल्ल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 09:02 AM
गर्मीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम आले आहेत? मग उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पानांचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

गर्मीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम आले आहेत? मग उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पानांचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

Follow Us
Follow Us:

आजकाल सर्वच स्त्रियांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार, डागविरहित हवी असते. पण वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढता तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे सुद्धा फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग, पिग्मेंटेशन आणि अकाली सुरकुत्या खूप सामान्य समस्या झाली आहे. तरुण वयात सुद्धा त्वचेचा समस्या वाढू लागल्या आहेत. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे काळे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेसपॅक लावून त्वचेची काळजी घेतली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेसवॉश, फेस स्क्रीम, सिरम इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. केमिकलयुक्त स्किन केअरच्या वापरामुळे काही काळापुरती त्वचा खूप जास्त सुंदर दिसते.(फोटो सौजन्य – istock)

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्स आणि मुरूम इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. कालांतराने समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच महागडे प्रॉडक्ट न वापरता घरगुती उपाय करून पाहावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा आतून हायड्रेट आणि चमकदार राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी त्वचेला बाहेर पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी कोणत्या हिरव्या पानांचे आहारात सेवन करावे.

कडुलिंबाच्या पानांचे फायदे:

मागील बऱ्याच वर्षांपासून शरीरसंबंधित वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील जुनाट आजार सुद्धा मुळांपासून नष्ट होतो. कडुलिंबाच्या कडवट पानांमुळे फारसे लक्ष दिले जात नाही. पण चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा आहारात समावेश करावा. नियमित एक किंवा दोन कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कायमचे नष्ट होतील आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी- फंगल आणि अंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग येण्याचे मुख्य कारण म्हणजे अशुद्ध रक्त आणि विषारी घटक बाहेर पडून न जाणे. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरतात. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे रक्तातील घाण स्वच्छ होते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स गायब होतात. कडुलिंबामध्ये ‘निम्बिडिन’ आणि ‘निम्बिन’ नावाचे घटक आढळून येतात. कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, पुळ्या आणि सूज कमी होऊन त्वचा आतून स्वच्छ होते. या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेमधील मेलेनिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Too many pimples on face due to heat then eat these green leaves on a hungry stomach the face will glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • benefits of neem
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
2

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
3

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
4

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.