Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

Mangan Recipe : गोवा मासांहारी पदार्थांसाठी खूप लोकप्रिय आहे. मन गण हा देखील गोव्याचा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. खिरीसारखाच असलेला हा पदार्थ चणाडाळ, साबुदाणा, नारळाचे दूध, गूळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 03:30 PM
सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश... तुम्ही कधी 'मन गण' खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश... तुम्ही कधी 'मन गण' खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • अनेकांना ठाऊक नाही गोव्याच्या या पारंपारिक पदार्थाची चव.
  • मन गण हा एक चवदार, गोड पदार्थ आहे जो सणाच्या दिवशी तयार केला जातो.
  • आज आपण अनेकांना ठाऊक नसणाऱ्या या पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
सण म्हटलं की घरी गोड पदार्थ हे आलेचं. भारतात तर सणालाच नाही तर आनंदाच्या प्रसंगीही आवडीने गोडाचा पदार्थ तयार केला जातो. अशात आपण गोडामध्ये रव्याचा शिरा, खीर, पुरणपोळी असे अनेक पदार्थ बनवले आणि खाल्ले असतील पण तुम्ही कधी ‘मन गण’ नावाचा पदार्थ खाल्ला आहे का? हा एक गोवन पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे जो गोव्यात सणसमारंभात आवर्जून बनवला जातो. घरी काही नवीन, पारंपारिक आणि चविष्ट असं काही ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करु शकता.

Summer Special : विकतंच कशाला? उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार ‘मँगो आईस्क्रिम’, लहनांसह मोठेही होतील खुश

घट्टसर पोत, गोड चव आणि याचा सुगंध एकंदरीतच पदार्थाच्या खासियेत आणखी भर घालतो. गोवन रेसिपीज प्रामुख्याने नाॅनव्हेज पदार्थांसाठी लोकप्रिय आहेत पण फार कमी लोकांना ‘मन गण’ या गोड पदार्थाची माहिती आहे. निवडक साहित्यापासून, झटपट तयार होणारी ही रेसिपी आपण एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवी. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • 50 ग्रॅम चण्याची डाळ
  • 25 ग्रॅम साबुदाणा
  • 1 कप नारळाचे घट्ट दूध
  • 1/2 कप बारीक चिरलेला गूळ
  • 6 बदाम
  • 6 काजू
  • 5 पिस्ता
  • 7-8 मनुके
  • 1/2 टी स्पून वेलची पावडर
  • 1/4 टी स्पून जायफळ पावडर
  • चवीनुसार मीठ
उष्णता कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट बनवा थंडगार नाचणीचे आंबील, पारंपरिक पेयामुळे शरीरात राहील गारवा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम डाळ स्वच्छ पाण्यात धुवून एक तासभर भिजवून ठेवावी. दुसरीकडे साबुदाणा आणि स्वच्छ पाण्यात धुऊन त्यातले पाणी काढून बाजूला झाकून ठेवा.
  • एका तासानंतर डाळ चांगली भिजली की ती कुकरला लावून त्यात थोडे पाणी टाकून एक शिट्टी काढून घ्यावी. लक्षात ठेवा डाळ आपल्याला खूप शिजवायची नाही आहे फक्त मऊ झाली पाहिजे आणि बोटांमध्ये डाळीचा दाणा दाबला गेला पाहिजे.
  • आता पातेल्यात एक टेबलस्पून तूप घ्या. तूप गरम झाले त्यामध्ये कापलेले ड्रायफ्रुट्स तळून बाजूला ठेवून द्या.
  • यानंतर शिजवलेली डाळ दोन ते तीन मिनिटं कढईत परतून घ्या. परतलेल्या डाळीमध्ये साबुदाणा टाका आणि तोही चांगला परतून घ्या.
  • दोन्ही जिन्नस चांगले परतून झाले की त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकावे. आणि त्याच्यात चांगले ढवळून घ्यावे.पाण्याला जराशी उकळी आली की गॅस बंद करा आणि त्यामध्ये नारळाचे काढलेले एक कप दूध टाकून मिसळून घ्या. यानंतर गॅस पुन्हा सुरु करुन मंद आचेवर शिजवत ठेवा.
  • दोन मिनिटं दूध त्याच्यात चांगले मिसळून गेले की त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ टाका. सतत मंद गॅसवर ढवळत राहा.
  • दूधात संपूर्ण साहित्या छान शिजलं की मग त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घाला.
  • शेवटी यात तळलेले ड्रायफूट्स घाला, काहीवेळ शिजवत एक उकळी काढा आणि गॅस बंद करुन तयार पदार्थ खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही हा पदार्थ गरमा गरम पुरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
  • ही रेसिपी cookpad वरुन घेण्यात आली आहे.

Web Title: Traditional goan sweet dish mangan recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Goa
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.