Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

कोरडा खोकला झाल्यानंतर घशात जळजळ किंवा वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोकला होऊ नये म्हणून हे उपाय करावेत. खोकला कमी होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2026 | 12:52 PM
कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Follow Us
Follow Us:

सर्दी खोकला होण्याची कारणे?
कोरड्या खोकल्यापासून बचाव करण्यासाठी काय खावे?
पावसाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

वातावरणात सतत होणारे बदल, व्हायरल, विविध संसर्ग जन्य आजार, धूळ, आहारात होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब इत्यादी समस्या उद्भवण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घेणे फार आवश्यक आहे. वारंवार आजारपणात वाढ झाल्यामुळे दैनंदिन जीवनातील कामे करताना अडथळे निर्माण होतात. थंड पदार्थांच्या सेवनामुळे किंवा साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे सर्दी खोकला होतो. सर्दी लवकरी बरी होते, मात्र खोकला कायमच टिकून राहतो. कोरडा खोकला लवकर बरा होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात खोकला वाढू नये म्हणून शरीराची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

पावसाळ्यात खोकला टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय:

पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे आजारपण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे खोकला टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बाहेरून किंवा गर्दीच्या ठिकाणाहून आल्यानंतर सगळ्यात आधी हातपाय स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून योग्य अंतर ठेवणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि घसा कोरडा पडत नाही.

रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळे खावीत. यामध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा यांसारखे पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यास मदत होईल. याशिवाय पावसाळयात अतिथंड पाणी, आईस्क्रीम, थंड पेये किंवा खूप थंड पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांच्या सेवनामुळे घशाला सूज येणे किंवा टॉन्सिल होण्याची शक्यता असते. धूम्रपान किंवा धूर असलेल्या वातावरणापासून दूर राहिल्यास खोकल्याचा त्रास कमी होतो आणि आराम मिळतो.

७ महिन्यांच्या गरोदर महिलेच्या मेंदूतून काढला दुर्मिळ ट्यूमर; जसलोक हॉस्पिटलमध्ये कठीण शस्त्रक्रिया यशस्वी, माता-बाळ सुरक्षित

पावसाळ्यात सगळ्यांच्या काहींना काही गरमागरम खाण्याची खूप जास्त इच्छा होते. तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे घशात जळजळ आणि अस्वस्थता लागते. तसेच शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यास घसा अधिक कोरडा पडून इन्फेक्शन वाढते. त्यामुळे वारंवार येणाऱ्या कोरड्या खोकल्यापासून बचाव करण्यासाठी नियमित गरम पाणी प्यावे. तसेच आल्याचा चहा, आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेला काढा प्यायल्यामुळे खोकला कमी होतो आणि आरोग्य सुधारते. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोरडा खोकला म्हणजे काय?

    Ans: ज्यामध्ये कफ निघत नाही आणि सतत घसा खवखवणे, जळजळ किंवा खोकल्याची भावना होते, त्याला कोरडा खोकला म्हणतात.

  • Que: कोरडा खोकला होण्याची कारणे कोणती?

    Ans: सर्दी, धूळ, प्रदूषण, हवामानातील बदल, ऍलर्जी, घशाची जळजळ किंवा संसर्गामुळे कोरडा खोकला होऊ शकतो.

  • Que: कोरडा खोकला किती दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

    Ans: खोकला अनेक दिवस टिकून राहिल्यास, वाढत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास, ताप, छातीत दुखणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Troubled by dry cough try these simple home remedies to get relief and keep your respiratory health strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • monsoon care

संबंधित बातम्या

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
1

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
2

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
4

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.