
डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मेंदूच्या कँन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
मेंदूच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे?
कोणत्या कारणांमुळे मेंदूमध्ये गाठी होतात?
वारंवार डोकेदुखी कोणत्या आजारामुळे होते?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. याशिवाय योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. मेंदूच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा तासनतास एका जागेवर बसून राहणे, मानसिक तणाव, झोपेची कमतरता आणि वारंवार स्क्रीन समोर बसून राहिल्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि हाडांमध्ये वेदना जाणवू लागतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते औषध उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. मेंदूमध्ये घडून येणाऱ्या अतिशय छोट्या बदलांचा परिणाम विचारशक्ती, दृष्टी, हालचाल आणि भावना इत्यादींवर परिणाम करतो.मेंदूमध्ये गाठी तयार झाल्यानंतर कोणत्याही क्षणी फिट येऊन व्यक्ती कोमात जाण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेंदूच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. पण मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. मेंदूमध्ये झालेल्या गाठींमुळे मेंदूच्या वरच्या भागात खूप जास्त तणाव जाणवू लागतो. शब्द आठवण्यास त्रास होणे, लक्ष विचलित राहणे, कामात अडथळे येणे, गोंधळल्यासारखे वाटणे, किंवा अचानक चिडचिड वाढणे इत्यादी अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसू लागतात. मात्र कालांतराने या लक्षणांमध्ये वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.
मेंदूच्या आजारांचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर दिसून येतो.मेंदूमध्ये वाढणाऱ्या गाठींमुळे धूसर दिसणे, दोन वस्तू दिसणे, चमकणारे प्रकाश दिसणे, बाजूची दृष्टी कमी होणे किंवा अचानक अंधुकपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही समस्या चष्म्याच्या नंबरमुळे नाहीतर मेंदूमध्ये वाढलेल्या गाठीमुळे उद्भवू लागते.
बऱ्याचदा कोणत्याही कारंणाशिवाय डोकेदुखी, उलट्या किंवा मळमळ होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. कारण मेंदूमध्ये तयार होणाऱ्या गाठीमुळे दृष्टी बदल, चक्कर येणे, प्रकाशाची संवेदनशीलता वाढणे इत्यादी लक्षणे सकाळच्या वेळी जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. मेंदूमध्ये गाठी झाल्यानंतर प्रामुख्याने सकाळच्या वेळी गंभीर लक्षणे दिसून येतात.
World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
मेंदूच्या आजाराची लागण झाल्यानंतर झोपेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. रात्रीच्या वेळी वाढलेली तीव्र डोकेदुखी किंवा सकाळी वाढलेल्या डोकेदुखीमुळे व्यवस्थित झोप लागत नाही. झोपल्यानंतर वारंवार जाग येणे, काही वेळा बोलताना, चालताना अचानक तोल जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. मेंदूच्या आजाराची लागण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शरीरात लक्षणे दिसू लागतात.
Ans: ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या ऊतींमध्ये पेशींची असामान्य वाढ। या गाठी सौम्य किंवा जीवघेण्या असू शकतात।
Ans: लक्षणे ट्यूमरच्या स्थानावर आणि आकारावर अवलंबून असतात. काही सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
Ans: शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल तपासणी