चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
सर्वच महिला त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही स्किन केअर रुटीन फॉलो करतात, तर कधी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचा काहीवेळा चमकदार आणि सुंदर दिसत नाही. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. पण चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स त्वचा खराब करून टाकतात. दैनंदिन आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे चेहऱ्यावर लगेच पिंपल्स किंवा ऍक्ने येतात. चेहऱ्यावर वारंवार कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा आधिक खराब होऊन जाते. व्हाईटहेड्स आल्यानंतर किंवा ब्लॅकहेड्स आल्यानंतर ते काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर सतत घाम येत राहतो. ज्यामुळे त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट होऊन जाते. त्वचा तेलकट झाल्यानंतर चेहऱ्यावर धूळ किंवा मातीचे कण सहज चिटकून राहतात. यामुळे चेहऱ्यावर बारीक बारीक पुरळ येऊन त्यात घाण तशीच अडकून राहते. नाक आणि गालाजवळ आलेल्या पिंपल्समुळे त्वचा अतिशय निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास त्वचा आतून स्वच्छ होईल आणि सुंदर दिसेल.
त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सहज निघून येतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसते. याशिवाय त्वचेच्या छिद्रांमध्ये डेड स्किन सुद्धा तशीच राहते. त्वचेवर आलेल्या छिद्रांमुळे चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जाते. अशावेळी त्वचेवर वाफ घेऊन कॉटनच्या कापडाने त्वचा स्वच्छ करून घ्यावी. यामुळे त्वचेवरील व्हाईटहेड्स कमी होतील.
व्हाईटहेड्स काढण्यासाठी फेसपॅकचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये हळद घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी टाकून फेसपॅक तयार करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून २० मिनिटं तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या फेसपॅकचा वापर केल्यामुळे त्वचेवरील महिन्याभरानंतर व्हाइटहेड्स तयार होणं कायमच बंद होईल.
त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य त्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. अन्यथा त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर त्वचेवर जास्त पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स तयार होतात. त्वचा उजळदार आणि चमकदार करण्यासाठी साबणाचा वापर करू नये. साबणाच्या वापरामुळे त्वचा कोरडी होऊन जाते.