चेहऱ्यावरील टॅनिंग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा वापर
प्रत्येक व्यक्तीला नेहमीच सुंदर आणि आकर्षित दिसायचं असतं. यासाठी महिला त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घेतात. त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर रुटीन, बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची गुणवत्ता खराब करण्याऐवजी चेहऱ्याला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करावा. याशिवाय त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. अनेकदा चुकीच्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहऱ्यावर रॅश किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सतत घाम येतो. सतत घाम आल्यामुळे त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे पिंपल्स किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. तसेच चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. उन्हात सतत बाहेर फिरण्यास गेल्यामुळे त्वचा काळवंडून जाते. काळी झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील टॅनिंग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेचा खराब झालेला रंग सुधारण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेवरील टॅनिंग सुधारण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. बटाटा त्वचेला लावल्यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसतो. त्वचेवरील टॅनिंग घालवण्यासाठी बटाटा किसून त्वचेवर लावा किंवा बटाट्याचा रस काढून चेहऱ्यावर लावून ठेवा. २० ते २५ मिनिटं झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे टॅनिंग कमी होईल आणि चेहरा सुंदर दिसेल.
टोमॅटोमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा स्वच्छ करतात. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डाग कमी होऊन जातात. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात बटाट्याचा रस टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल.