Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षयरोग केवळ फुफ्फुसांमध्येच नाहीतर डोळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो! डोळ्यात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

डोळ्यांचा क्षयरोग झाल्यानंतर शरीरातील विषाणू रक्तप्रवाहातून डोळ्यांपर्यांत पोहचतात. त्यामुळे डोळ्यांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया डोळ्यांचा क्षयरोग झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 05:30 AM
क्षयरोग केवळ फुफ्फुसांमध्येच नाहीतर डोळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो! डोळ्यात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

क्षयरोग केवळ फुफ्फुसांमध्येच नाहीतर डोळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो! डोळ्यात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

डोळ्यांचा क्षयरोग कशामुळे होतो?
डोळ्यांच्या क्षयरोगाची लक्षणे?
टीबीचे विषाणू डोळ्यांपर्यंत कसा पोहचतो?

जगभरात गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील वेगाने पसरणारा आजार म्हणजे क्षयरोग. हा गंभीर आजार जागतिक स्तरावर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे पहिल्या टप्प्यातील आजार शेवटच्या टप्प्यात पोहचतो आणि शरीरासाठी जीवघेणा ठरतो. टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू थेट फुफ्फुसांवर परिणाम करतो. त्यामुळे हा आजार फुफ्फुसांशी संबंधित मानला जातो.(फोटो सौजन्य – istock)

आशेचा श्वास! सहा महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या लकवाग्रस्त रुग्णाला पुन्हा स्वतंत्रपणे श्वास घेण्यास डॉक्टरांनी केली मदत

टीबी झाल्यानंतर फुफ्फुस पूर्णपणे निकामी होऊन जातात. क्षयरोगाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाहीतर किडनी, हाडे आणि डोळ्यांवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांसंबंधित लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचा टीबी झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? हा गंभीर आजार कशामुळे होतो? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

डोळ्यांमध्ये टीबी कशामुळे होतो?

फुफ्फुसांमध्ये क्षयरोगास कारणीभूत ठरणारे जिवाणू डोळ्यांतील क्षयरोगाचा मोठ्या प्रमाणावर वाढवतात. डोळ्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. बऱ्याचदा डोळ्यांचा क्षयरोग झाल्यानंतर कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न झाल्यामुळे काहीवेळा रुग्णांना डोळ्यांची दृष्टी किंवा जीव सुद्धा गमवावा लागतो. टीबीचे विषाणू रक्ततातून डोळ्यांपर्यांत पोहचते. त्यानंतर हा धोका निर्माण होतो. रेटिना, कोरॉइड आणि ऑप्टिक नर्व्ह इत्यादी अवयवांवर परिणाम होतो. एचआयव्ही रुग्ण, मधुमेह रुग्ण, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आणि आधीच क्षयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांना डोळ्यांचा टीबी होण्याची जास्त शक्यता असते.

डोळ्यांच्या क्षयरोगाची लक्षणे:

  • डोळ्यांमध्ये वारंवार लालसरपणा आणि वेदना
  • प्रकाशाची संवेदनशीलता
  • अंधुक दृष्टी
  • प्रकाशाचे झोत दिसणे
  • डोळ्यांसमोर काहीतरी तरंगताना दिसणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काहीवेळा टीबीचे विषाणू रेटिनापर्यंत किंवा ऑप्टिक
  • नर्व्हपर्यंत पोहचल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते.
हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका

डोळ्यांचा क्षयरोग झाल्यास काय करावे?

डोळ्यांचा क्षयरोग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डोळ्यांच्या क्षयरोगाची प्रकरणे अतिशय दुर्मिळ असतात. डोळ्यांचा क्षयरोग फुफ्फुसांच्या क्षयरोगा इतका घातक नसतो. क्षयरोगविरोधी उपचार पद्धतीमध्ये अँटी-ट्युबरक्युलर थेरपी घेतली जाते. या आजारावर वेळीच उपचार केल्यास ६ ते ९ महिन्यामध्ये क्षयरोग बरा होऊ शकतो. डोळ्यांना वारंवार सूज येणे किंवा अंधुकपणा जाणवत असेल तर तातडीने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: क्षयरोग (टीबी) डोळ्यांमध्ये होऊ शकतो का?

    Ans: होय. क्षयरोग केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित नसून तो शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांनाही प्रभावित करू शकतो. याला ऑक्युलर टीबी (Ocular Tuberculosis) असे म्हणतात.

  • Que: डोळ्यांतील टीबीची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: डोळे लाल होणे, धूसर दिसणे, प्रकाशाची संवेदनशीलता वाढणे, डोळ्यात वेदना होणे, डोळ्यांसमोर तरंगणारे डाग दिसणे (floaters) आणि दृष्टी कमी होणे ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: डोळ्यांतील टीबीमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याचा किंवा गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.

Web Title: Tuberculosis can occur not only in the lungs but also in the eyes do not ignore these symptoms in the eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • eye infection
  • Health Care Tips
  • TB

संबंधित बातम्या

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले तीळ नियमित खाल्ल्यास शरीराला मिळेल भरपूर पोषण, हाडे राहतील मजबूत
1

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले तीळ नियमित खाल्ल्यास शरीराला मिळेल भरपूर पोषण, हाडे राहतील मजबूत

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
2

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
3

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
4

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.