Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! प्लास्टिकच्या पिशवीची ही ट्रिक पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

Ukadiche Modak Recipe: गणेशोत्सवात उकडीचे मोदक बनवताना सुंदर कळीदार आकार देणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. मात्र मोदकाची उकड मऊ आणि व्यवस्थित मळलेली असेल तर कळ्या पाडणे सोपे जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 28, 2026 | 01:45 PM
Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मोदकाची पारी मऊ असणे सर्वात महत्त्वाचे.
  • पारीच्या कडा बारीक आणि मधला भाग थोडा जाड ठेवा.
  • उकड ओल्या कापडाने झाकल्यास ती मऊ राहते.
गणपती बाप्पा घरी आले की स्वयंपाकघरातून सर्वात आधी आठवण येते ती मोदकांची. गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यातून येणारा नारळ-गुळाचा वास म्हणजे गणेशोत्सवाची खास मजाच. पण मोदक बनवताना एक काम अनेकांना कठीण जाते, ते म्हणजे त्याला छान कळ्या पाडणे.

हाताने कळ्या काढताना त्या कधी मोठ्या तर कधी छोट्या होतात. काही वेळा मोदक बंद करताना सगळ्या कळ्यांचा आकारही बिघडतो. त्यामुळे अनेक जण थेट बाजारातून मोदकाचा साचा घेऊन येतात. मात्र घरात असलेल्या काही साध्या वस्तूंच्या मदतीनेही हे काम सोपे करता येते. Ukadiche Modak Recipe:

पारी मऊ असणे सगळ्यात महत्त्वाचे

मोदक सुंदर दिसण्यासाठी सुरुवातीपासूनच पारीकडे लक्ष द्यावे लागते. उकड नीट मळलेली आणि मऊ असेल तर पुढचे काम सहज होते. उकड कडक झाली तर पारी करताना ती तुटू शकते.

तयार पीठ बराच वेळ उघडे ठेवू नका. ओल्या कापडाने झाकून ठेवल्यास ते मऊ राहते. मोदकासाठी छोटा गोळा घेऊन हाताने नीट फिरवून घ्यावा. हाताला चिकटत असल्यास अगदी थोडे तूप वापरता येते.

पारीचा मधला भाग थोडा जाड ठेवला तर मोदक भरताना आणि बंद करताना तो फाटत नाही. कडा मात्र तुलनेने बारीक असाव्यात. पारी तयार झाल्यावर तिला हाताने हळूहळू वाटीसारखा आकार द्यावा.

प्लास्टिकच्या शीटची भन्नाट मदत

हाताने कळ्या पाडणे जमत नसेल तर स्वच्छ आणि जाड प्लास्टिकचा तुकडा वापरून पाहा. पारी प्लास्टिकवर ठेवून त्यावर दुसरा तुकडा ठेवावा. त्यानंतर हलक्या हाताने पारी लाटावी.

पारी तयार झाल्यावर वरचा प्लास्टिकचा भाग काढून त्यात सारण भरावे. आता प्लास्टिकच्या मदतीने पारी वर उचलत हळूहळू तिच्या कडा एकत्र आणाव्यात. बोटांनी जास्त दाब देण्याची गरज नाही. हलक्या चिमटी घेत गेल्यास कळ्यांसारखा आकार तयार होतो. या पद्धतीत सुरुवातीला थोडा सराव लागेल, पण हात बसल्यानंतर मोदकाचा आकार चांगला येतो.

चमच्याने आधी खुणा करा

कळ्या पडतात, पण त्या एकसारख्या दिसत नाहीत, अशी अडचण असेल तर एक छोटी युक्ती वापरता येते. पारी लाटल्यानंतर छोट्या वाटीने तिच्या मध्यभागी हलकी गोल खूण करा.

त्यानंतर चमच्याच्या मागच्या बाजूने पारीवर समान अंतरावर हलक्या खुणा द्याव्यात. साधारण आठ ते बारा ठिकाणी अशा खुणा करता येतील. मात्र पारी कापायची नाही, फक्त निशाणी करायची आहे.

Workout and Heart Health: वर्कआऊट फायदेशीर, पण ‘या’ चुका पडू शकतात महागात; हृदयाची काळजी कशी घ्याल?

आता प्रत्येक खुणेच्या ठिकाणी अंगठा आणि तर्जनीने हलकी चिमूट घेत गेल्यास कळ्या जवळपास समान आकाराच्या दिसतात. सुरुवातीला ही पद्धत उपयोगी पडते. नंतर हाताला सवय झाली की खुणा करण्याचीही गरज राहत नाही.

दोन वाट्यांची पद्धतही सोपी

घरात दोन वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या वाट्या असतील तर त्यांचाही उपयोग करता येतो. लहान वाटीत प्लास्टिकचा तुकडा ठेवून त्यावर पारी ठेवावी. हाताने हलका दाब देऊन पारीला वाटीचा आकार द्यावा.

गरज वाटल्यास त्यावर दुसरी वाटी ठेवून अगदी हलका दाब देता येतो. त्यामुळे पारीचा आकार व्यवस्थित होतो. त्यात सारण भरल्यानंतर प्लास्टिकच्या मदतीने कडा वर आणून मोदक बंद करता येतो. ही पद्धत विशेषतः ज्यांना बोटांनी पारीचा आकार देणे अवघड जाते त्यांच्यासाठी सोयीची ठरू शकते.

घरच्या घरी कागदाचा साचाही बनवता येतो

मोदकाचा तयार साचा नसेल तर बटर पेपरची मदत घेता येते. कागदाची काही वेळा घडी करून गोल आकारात कापावा आणि त्यावर ठरावीक अंतराने छोटे कट द्यावेत. कागद उघडल्यानंतर समान अंतरावर खाचा तयार होतील.

त्यावर पारी ठेवून प्रत्येक खाचेच्या जागी हलकी चिमूट घेतली की कळ्यांचा आकार तयार होतो. ही पद्धत वापरताना कागद स्वच्छ आणि अन्नपदार्थांसाठी योग्य असणे महत्त्वाचे आहे.

घरातील लाकडी फर्निचरला अचानक वाळवी लागल्यास ती नष्ट करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या

शेवटच्या टप्प्यात घाई नको

मोदकाच्या कळ्या तयार झाल्यानंतर सारण भरावे आणि मग सावकाश कडा बंद कराव्यात. बंद करताना जास्त जोर लावला तर आधी केलेल्या कळ्या सपाट होऊ शकतात. मोदकाचे वरचे टोकही हलक्या हाताने बंद करावे. पारी कुठे कोरडी वाटत असेल तर अगदी थोडे तूप लावता येते. मात्र जास्त तूप वापरल्यास कडा एकमेकांना चिकटवताना अडचण येऊ शकते.

Web Title: Ukadiche modak recipe an easy trick to make pleated modaks at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • food
  • lifesytle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
1

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Workout and Heart Health: वर्कआऊट फायदेशीर, पण ‘या’ चुका पडू शकतात महागात; हृदयाची काळजी कशी घ्याल?
2

Workout and Heart Health: वर्कआऊट फायदेशीर, पण ‘या’ चुका पडू शकतात महागात; हृदयाची काळजी कशी घ्याल?

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी
3

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!  झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा
4

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.