गणपतीला गजमुख, वक्रतुंड, गजानन ही आणि अशी खूप नावं आहेत. याचं कारण म्हणजे हत्तीच्या सोंडेमुळे गणपती बाप्पाला पडलेली ही नावं. माता पार्वतीच्या आज्ञेनुसार, गणपती बप्पा पाहारा देत असताना त्याने महादेवांना अडवलं त्यांनर त्यांच्यात वाद प्रतिवाद झाले आणि रागाच्या भरात महादेवांनी गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला. त्यानंतर गणपतीला हत्तीचं मुख लावण्यात आलं आणि मग गजमुख किंवा अशीच इतर नावं पडल्याची कथा आपल्याला माहितच आहे.
गणपती बप्पा म्हटलं की तो डाव्या किंवा उजव्या सोंडेचा अशीच त्याच्या प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र जगातील असं एकमेव गणपती मंदिर आहे ज्या मंदिरात गणपतीची मुर्ती ही गजमुख नसून मानवी चेहऱ्याची आहे. कुठे आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात…
तामिळनाडुमध्ये असं एकमेव गणपती मंदिर आहे जे मानवी चेहरा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. तामिळनाडुच्या कूथानुर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे गणेश मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचं नाव आहे आदीविनायक मंदिर. अष्टविनायक गणपती म्हणून देखील हे मंदिर ओळखलं जातं. याला नरमुख गणेश मंदिर असं देखील म्हणतात. अर्थात याचं कारण म्हणजे या गणपतीची मुर्ती मानवी चेहऱ्याची आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही मुर्ती आहे. ध्यानस्थ बसलेले मानवी चेहऱ्याचा गणपती बाप्पाची मूर्ती येथे पाहायला मिळते.
काही संदर्भानुसार असं देखील म्हटलं जातं की, याचा संबंध रायायणाशी येतो. प्रभू रामचंद्राने पितरांना शांती लाभावी यासाठी पूजा केली होती त्यामुळे हीच प्रथा आजतागायत सुरु आहे. या गणेशमंदिरात आपल्या पुर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून पूजा घातली जाते.
भगवान शंकरांनी गणपतीचा शिरच्छेद केला आणि गजमुख बसविले. मात्र आदी विनायक हा या सगळ्या घटनेच्या आधी असलेला मूळ चेहऱ्याचा गणपती आहे. या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक देश विदेशातल्या कानाकोपऱ्यातून येतात. गणेश चतुर्थी आणि महाशिवरात्रीला भाविक एकत्र येत उत्सव साजरा करतात. या प्राचीन आणि दुर्मिळ गणेशमंदिराचं सर्वांना आकर्षण वाटतं. तर अशी आहे या सुखर्ता दुखहर्ता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या रुपाची ही गोष्ट.