
Sanjeev Kapoor Tips: मोदकाची उकड फाटतेय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणेश चतुर्थी आली की सगळ्यांच्या घरी मोदक बनतात. बाप्पाला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय सण पूर्णच होत नाही. पण खरं सांगायचं तर उकडीचे मोदक बनवणं तेवढं सोपं नाहीये. सारण तर सगळ्यांना जमतं, पण पारी बनवताना आणि कळ्या पाडताना सगळा गोंधळ होतो. मोदक फुटतात, आकार बिघडतो.हाच प्रॉब्लेम सगळ्यांना येतो म्हणून फेमस शेफ संजीव कपूर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात त्यांनी अगदी सोप्या भाषेत परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवलं आहे. पहिल्यांदा बनवणाऱ्यांसाठी तर ही ट्रिक एकदम भारी आहे.
एक कढई घ्या, त्यात तूप गरम करा. त्यात किसलेला गूळ टाका आणि तो वितळेपर्यंत हलवत राहा. गूळ वितळला की त्यात खवलेला नारळ टाका. गॅस बारीकच ठेवा. आता त्यात वेलची पूड, जायफळ पूड आणि भाजलेली खसखस टाका. सगळं छान मिक्स करा. नारळ थोडा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. झालं की एका ताटात काढून थंड व्हायला ठेवा. Sanjeev Kapoor Tips:
एक पातेलं घ्या त्यात 2 कप पाणी टाका आणि चिमूटभर मीठ टाका. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ टाका. गॅस एकदम बारीक करा आणि एक मिनिटभर सतत ढवळत राहा. आता झाकण ठेवा आणि 2-3 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्या. परत थोडं पाणी शिंपडा आणि परत झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवा. असं दोन तीन वेळा करा.आता हे पीठ एका मोठ्या परातीत काढा. थोडं कोमट असतानाच हाताने चांगलं मळून घ्या. पीठ एकदम मऊ आणि लवचिक झालं पाहिजे. हीच खरी ट्रिक आहे. पीठ मळून झालं की त्यावर ओला कपडा टाकून अर्धा तास झाकून ठेवा. म्हणजे पीठ चांगलं मुरेल.
High Cholesterol वर नियंत्रण ठेवायचंय? रोजच्या आहारात ‘ही’ 5 पेये ठरू शकतात उपयोगी
अर्ध्या तासानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करा. हाताला थोडं तेल किंवा तूप लावा. आता एक गोळा घ्या आणि हातावरच त्याची छोटी वाटी बनवा. कडा पातळ ठेवा मधला भाग थोडा जाड. आता त्यात तयार केलेलं सारण भरा.आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळ्या पाडणं. अंगठा आणि बोटाने हळू हळू कळ्या पाडा आणि वरती एकत्र आणून बंद करा. जास्त दाबू नका नाहीतर मोदक फुटेल. हलक्या हाताने काम करा.
Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे
स्टीमरमध्ये किंवा मोदक पात्रात पाणी गरम करा. ज्या चाळणीवर मोदक ठेवणार तिला थोडं तूप लावा म्हणजे मोदक चिकटणार नाहीत. सगळे मोदक ठेवून 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या. झाले तुमचे गरमागरम उकडीचे मोदक तयार.परफेक्ट मोदकाचं सिक्रेट काय?संजीव कपूर सांगतात की उकडीच्या मोदकाचं सगळं सिक्रेट पिठातच आहे. पीठ जर मऊ आणि गुळगुळीत मळलं आणि त्याला अर्धा तास मुरू दिलं तर मोदक अजिबात फुटत नाहीत आणि त्याला आकार पण छान येतो.या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पण मोदक दुकानात मिळतात तसेच सुंदर दिसतील. या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून बघा.