काळ्या काखेसाठी सोपे घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
जर तुम्हीदेखील अशाच महिलांपैकी एक असाल, तर हा लेख तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ जुश्या भाटिया सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये अंडरआर्म्स मऊ आणि स्वच्छ ठेवण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Dr. Jushya Bhatia Sarin (@dr.jushya_sarinskin)
त्वचारोगतज्ञांच्या मते, अंडरआर्म्स मऊ ठेवण्यासाठी, त्वचा स्वच्छ करणे तसेच मृत त्वचा काढून टाकणे महत्त्वाचे आहे म्हणजेच त्वचा एक्सफोलिएट करायला पाहिजे. यासाठी, तुम्ही ६-१२% लॅक्टिक ऍसिड असलेले बॉडी लोशन वापरू शकता. लॅक्टिक ऍसिड त्वचेच्या वरच्या थरावर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा पूर्वीपेक्षा अधिक मऊ आणि नितळ दिसते.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, लोक अनेकदा चेहऱ्यावर, हातांवर आणि पायांवर क्रीम किंवा लोशन लावतात, पण आपल्या काखेकडे दुर्लक्ष करतात. दिवसातून किमान एकदा आपल्या काखेला हलके बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची त्वचा ओलसर आणि मऊ राहण्यास मदत होते.
काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, काख होईल स्वच्छ
जर तुम्ही काखेतील केस काढण्यासाठी रेझर वापरत असाल, तर कधीही ड्राय शेविंग करू नका. कारण ड्राय शेविंगमुळे त्वचेचा पोत खडबडीत होऊ शकतो. शेविंग करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या काखेत कोणताही हलका बॉडी वॉश किंवा शेविंग जेल लावू शकता. फेस लावल्यानंतर, केसांच्या दिशेने हळुवारपणे शेविंग करा. शेविंगनंतर, तुमची त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
तज्ज्ञांच्या मते, वारंवार शेविंग केल्याने त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ शकते किंवा त्वचेवर लहान डाग राहू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही लेझर हेअर रिडक्शनचा पर्याय निवडू शकता. यामुळे वारंवार शेविंग करण्याची गरज नाहीशी होईल आणि तुमची काख स्वच्छ व मुलायम राहील.
Ans: काखेतून घामाचा वास येणे हा एक सामान्य त्रास आहे. घाम त्वचेवरील जिवाणूंच्या (bacteria) संपर्कात आल्यामुळे हा वास येतो. तुरटी, बेकिंग सोडा, Apple Cider व्हिनेगर, कडुलिंब आणि तुळस असे अनेक घरगुती उपाय आहेत
Ans: बटाट्याचे काप, बटाट्याचा रस, लिंबू आणि मध, हळद आणि दही, बेकिंग सोडा, लिंबू पाणी असे अनेक घरगुती उपाय वापरता येतात
Ans: घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही वापरामुळे त्वचेवर Allergy येऊ शकते






