काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस
उन्हाळाच्या दिवसांमध्ये काखेत खूप जास्त घाम येऊन चिकटपणा वाढतो. तसेच सतत येणाऱ्या घामामुळे दुर्गंधी वाढून काखेतील त्वचा काळी पडून जाते. काखेतील त्वचा काळी झाल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि स्लिव्हलेस कपडे घालण्याची मनात भीती निर्माण होते. सतत घाम येणे, घट्ट कपडे घालणे, त्वचेवर घर्षण होणे, योग्य स्वच्छता न राखणे तर केमिकल युक्त वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर केल्यामुळे काखेतील त्वचा खूप जास्त काळी पडते. अशावेळी काळेपणा घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले परफ्युम वापरले जातात तर कधी वेगवेगळे स्किन केअर करून काखेतील त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते.(फोटो सौजन्य – istock)
काखेत वाढलेली दुर्गंधी आणि काळेपणा कमी करण्यासाठी कायमच बाजारातील केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून आणि योग्य स्वच्छता फॉलो करून काखेतील त्वचेची काळजी घ्यावी. काही साधे सोपे उपाय करून तुम्ही काखेत वाढलेला काळेपणा कमी करू शकता. घरगुती उपाय नैसर्गिकरित्या त्वचा स्वच्छ, फ्रेश आणि मऊ ठेवण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया काखेतील काळेपणा आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिशय घट्ट कपडे परिधान न करता सैल आणि आरामदायी कपडे परिधान करावेत. दिवसातून किमान दोन वेळा सौम्य साबणाने काख स्वच्छ धुवून घ्यावी. यामुळे काखेतील त्वचा काळी पडणार नाही. जास्त घाम साचून राहिल्यामुळे दुर्गंधी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात कायमचे कॉटनचे आरामदायी कपडे वापरावेत.
मागील बऱ्याच वर्षांपासून गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाणी त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यासाठी स्प्रे बाटलीमध्ये गुलाब पाणी भरून अंघोळ झाल्यानंतर काख स्वच्छ आणि कोरडी करून घ्या. त्यानंतर गुलाब पाणी काखेत लावून स्प्रे करून ठेवा. यामुळे घाम आल्यानंतर सुद्धा त्वचा खूप जास्त फ्रेश आणि ताजीतवानी वाटते.
काखेत वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. रस हातांवर घेऊन काखेत लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काखेत जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि काख स्वच्छ होईल. याशिवाय कोरफडचा गर सुद्धा काखेत लावल्यास दुर्गंधी आणि काळेपणापासून सुटका मिळेल.






