Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …! लग्नात नववधू-वरासाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, संसाराची वाढेल आणखीनच गोडी

लग्नात उखाणे घेणे ही पूर्वीच्या काळापासून चालत असलेली जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा अजूनही फॉलो केली जात आहे. लग्नात घेता येतील असे नववधू वरासाठी भन्नाट उखाणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 02:07 PM
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, ...! लग्नात नववधू-वरासाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, संसाराची वाढेल आणखीनच गोडी

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, ...! लग्नात नववधू-वरासाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, संसाराची वाढेल आणखीनच गोडी

Follow Us
Follow Us:

सध्या सगळीकडे लग्न सोहळ्यांचा सिझन सुरु झाला आहे. लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने आधीपासूनच साड्या खरेदी, दागिने इत्यादी विविध गोष्टींची खरेदी केली जाते. पण लग्नात अतिशय महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे उखाणे. गृहप्रवेश करताना किंवा लग्नाच्या विधींमध्ये नववधू वर वेगवेगळे गंमतीशीर उखाणे घेतात. लग्नात उखाणे घेणे ही पूर्वीच्या काळापासून चालत असलेली जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा अजूनही फॉलो केली जात आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत उखाणा घेण्याची प्रथा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली आहे. चार चौघांमध्ये पतीचे नाव घेणे टाळले जाते. अशावेळी उखाणे घेऊन पतीचे नाव घेतले जाते. पहा नववधू वरासाठी भन्नाट उखाणे.(फोटो सौजन्य – pinterest)

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लाजेने चढली लाली

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रूप मला फार आवडले

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची

चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार

करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
…रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं
निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे नाव घेते ( मुलीचे नाव) लक्ष द्या सारे
अतरवाळी पतरवाळी पतरवाळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा
_ रावांचा नाव घेते आतातरी आमची वाट सोडा …!

नाव घ्यायला सुरवात करते कुलस्वामिनीला स्मरून
आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून
उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी माझीच दुसरी माउली
ज्यांच्यामुळे आज सर्वांचे चेहरे आहेत हसरे अशे स्वभावाला एक नंबर माझे सासरे
संसाराच्या वाटेवर नंदाने दिलाय मला हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला खूप साथ
लक्ष्मी च्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे आता माझी ओळख करून देते मी सौ. (नवऱ्या मुलीचे पूर्ण नाव)
जमले आहे सगळे (नवऱ्या मूळचे आडनाव ) यांच्या दारात _ रावांचा नाव घेते आता येऊ का घरात..!

कण-कण फुगली, मन-मन माती,
उतरल्या भिंती चितरले खांब,
आत्याबाईच्या पोटी जन्मले राम,
राम गेले शेतात,
शेतातून आणल्या करडी,
करडीत झाल्या आरडी,
आरडीचं केलं तेल,
तेल ठेवलं शिक्यावर
_ रावांचा नाव घेते लग्नाच्या मुहूर्तावर..!

नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं
सप्तपदीच्या या वाटेवर मी तुला नेहमीच साथ देईन
तुझ्यासाठी एक शर्ट घेतांना मला दोन साड्या आणि दोन ड्रेस नक्कीच घेईल

Web Title: Unique and fun wedding ukhane for bride and groom to add sweetness to married life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Wedding Season
  • wedding tips

संबंधित बातम्या

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा
1

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
2

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ…! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू
3

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ…! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध
4

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.