Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी! पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मध दालचिनीचा वापर

शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते. मात्र दालचिनी मधाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. जाणून घ्या दालचिनी मधाचे पाणी बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 08:37 AM
पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मध दालचिनीचा वापर

पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मध दालचिनीचा वापर

Follow Us
Follow Us:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. याशिवाय शरीरावर अनावश्यक चरबी वाढण्यास सुरुवात होते, ज्यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात.वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. मात्र ट्रीटमेंट केल्यानंतर वाढलेले वजन कमी होण्यासोबतच शरीराला हानी पोहचण्याची सुद्धा शक्यता असते.वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीनशेक किंवा वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – iStock)

अचानक येईल हार्ट अटॅक! महिनाभर आधी शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, उद्भवेल मृत्यू

वजन कमी करताना आहारात कोणत्याही चुकीच्या प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी आहारात घरगुती आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. महिनाभरात वजन कमी करण्यासाठी आहारात बडीशेप, अळशी, मेथी दाणे, चिया सीड्स इत्यादी अनेक पदार्थाचे सेवन केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात दालचिनी आणि मधाचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दालचिनी आणि मध आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

दालचिनी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी मधाचे पेय अतिशय प्रभावी ठरते. वाढलेले वजन नैसर्गिकरित्या कमी करावे. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचून आरोग्य बिघडू शकते.

दालचिनी मधाचे पाणी कसे तयार करावे:

दालचिनी मधाचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. टोपातील पाणी गरम झाल्यानंतर त्यात दालचिनीचा बारीक तुकडा टाकून पाणी व्यवस्थित उकळेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेल्या पाण्यात मध टाकून सेवन करावे. या पाण्याचे सकाळी उठल्यानंतर महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय चयापचय क्रिया वेगवान होईल.

मसल्समध्ये वारंवार वेदना होतात? शरीरात पाणी कमी झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, बॉडी होईल डिहायड्रेट

मध दालचिनीचे पाणी कधी प्यावे:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात मध दालचिनीचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे साथीच्या आजारांपासून सुटका मिळते. याशिवाय सर्दी, खोकला झाल्यास मध दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी दालचिनी मधाच्या पाण्याचे सेवन करू शकता. याशिवाय दिवसभर भूक नियंत्रणात राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use honey cinnamon in this way to reduce belly fat weight loss home remedies health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
1

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
3

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
4

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.