शरीरात पाणी कमी झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक किंवा अर्धा ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते. पाण्याचे भरपूर सेवन केल्यामुळे गंभीर आजारांपासून शरीर निरोगी राहते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. संपूर्ण शरीराच्या कार्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पाणी कमी झाल्यानंतर सतत चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात पाणी कमी झाल्यानंतर लघवीचा रंग अतिशय गडद होऊन जातो. याशिवाय जळजळ होणे किंवा उन्हाळी लागणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास भरपूर पाणी आणि नारळ पाण्याचे सेवन करावे. याशिवाय लघवीचा रंग बदलू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे.
शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता पचनक्रिया बिघडण्यामागेच महत्वाचे कारण आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे अपचन, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. सकाळी पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसल्यास नियमित उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे.
बऱ्याचदा डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होतात. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय भूक लागल्यानंतर किंवा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोके दुखीची समस्या उद्भवते.
रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा ‘या’ पदार्थाचे सेवन, राहाल कायम निरोगी
पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पण शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे हाडांमध्ये वेदना, मसल्स दुखणे किंवा शरीर आखडल्यासारखे वाटू लागते. तसेच शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येणे, त्वचा रुक्ष किंवा कोरडी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.