Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

गुडघे आणि हाताच्या कोपऱ्यांवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा सुंदर दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2025 | 09:38 AM
गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर

गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. त्वचा कायमच मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण हात आणि पायांवर त्वचेकडे जास्त लक्ष दिले जात नाही. गुडघे आणि हातांचे कोपरे काळे होऊन जातात. शरीरावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचेवर डेड स्किन मोठ्या प्रमाणावर जमा होते. ज्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. काहीवेळा खाज येणे, लाल रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा वाढू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा भेंडीच्या पाण्याचा वापर, केस होतील मऊ

सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. डेड स्किन जमा झाल्यानंतर हातांचे कोपरे किंवा गुडघे खूप जास्त काळे दिसू लागतात. काळेपणा वाढल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचा आतून स्वच्छ करतात आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होते.

गुडघे आणि कोपरांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी उपाय:

डेड स्किन कमी करण्यासाठी टोमॅटो, कॉफी, तांदळाचे पीठ, दही आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात कॉफी पावडर, दही आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर लावून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास त्वचेवर वाढलेले टॅनिंग पूर्णपणे कमी होईल.

चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बेसन पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, होममेड फेसपॅक आणेल त्वचेवर ग्लो

टोमॅटोचे फायदे:

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. यामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पेक्टिन गुणधर्म त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी टोमॅटो अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय यामध्ये असलेले अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म त्वचेवरील डेड स्किन कमी करून त्वचा उजळदार करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use these kitchen products to get rid of dark spots on knees and elbows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
2

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
4

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.