पावसाळ्यात केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग 'या' पद्धतीने करा भेंडीच्या पाण्याचा वापर
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे थंडगार वातावरण असते. थंडीच्या दिवसांमध्ये निसर्ग खुलून दिसतो. पण याच दिवसांमध्ये आरोग्य, त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत पावसात भिजल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. याशिवाय केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस अचानक तुटणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस आणखीनच खराब होऊन जातात. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
स्कॅल्पवर होतेय इचिंग? वापरात आणा ‘हा’ उपाय, डँड्रफला करा राम-राम
पावसात सतत केस भिजल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि झाडूसारखे होऊन जातात. केसांमधील मऊपणा पूर्णपणे नष्ट होऊन जातो. त्यामुळे केसांमधील फ्रिझीनेस कमी करण्यासाठी भेंडीच्या रसाचा वापर करावा. भेंडीच्या रसात असलेले गुणधर्म केस अतिशय सुंदर आणि चमकदार ठेवतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी भेंडी गुणकारी ठरते. केसांमधील फ्रिझीनेस कमी करण्यासाठी भेंडीचे जेल बनवण्याची सोपी कृती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भेंडीमध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांमधील फ्रिझीनेस कमी करतात आणि केस चमकदार करण्यासाठी मदत करतात.
टोपात ३ ग्लास पाणी घेऊन ते उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात कापून घेतलेली भेंडी आणि चमचाभर मेथी दाणे टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर त्यात वाटीभर कोरफड रस टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मिश्रण हळूहळू घट्ट होईल. तयार केलेले पाणी गाळून झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये भेंडी हेअर मास्क.
केस कोरडे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने केसांवर लावा चहाचे पाणी, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
तयार केलेला हेअर मास्क केसांवर लावण्याआधी केस व्यवस्थित फणीने केस विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे तयार केलेला हेअर मस्की लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांवर मसाज करा. ३० ते ४० मिनिटांपर्यंत हेअर मास्क केसांवर तसाच ठेवून द्या. त्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांवर लावू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होईल. भेंडीच्या हेअर मास्कमध्ये तुम्ही खोबऱ्याचे तेल सुद्धा मिक्स करू शकता. यामुळे केसांना पोषण मिळेल.