चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बेसन पिठात मिक्स करा 'हे' पदार्थ
देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. वेगवेगळे स्किन केअर मास्क, फेसपॅक किंवा क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जात आहे. चेहरा आधी सुंदर करण्याच्या नादात केमिकलयुक्त प्रॉडक्ट त्वचेचा पूर्णपणे खराब करून टाकतात. सौंदर्य खुलवण्यासाठी वापरले जाणारे स्किन केअर प्रॉडक्ट काहीवेळा त्वचेला हानी पोहचवतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार दिसते. मागील अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन पिठाचा वापर केला जात आहे. बेसन पिठात असलेले गुणधर्म त्वचा अधिक सुंदर करतात.(फोटो सौजन्य – istock)
स्कॅल्पवर होतेय इचिंग? वापरात आणा ‘हा’ उपाय, डँड्रफला करा राम-राम
त्वचा आणखीनच सुंदर आणि उजळदार करण्यासाठी बेसन पिठाचा वापर करावा. पूर्वीच्या काळी सुंदर दिसण्यासाठी महिला बेसन पिठात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावत असे. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग, सुरकुत्या किंवा त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळत असे. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन पिठाचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी बेसन पिठात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बेसन पिठाचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच तुम्ही त्वचा सुंदर करण्यासाठी सुद्धा बेसन पिठाचा वापर करू शकता. बेसन चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचा उजळदार दिसते. बेसनाच्या पिठात अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, प्रोटीन, विटामिन्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता.
बेसन आणि हळद मिक्स करून लावल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर होते. यासाठी वाटीमध्ये बेसन आणि हळद घेऊन मिक्स करा. त्यानंतर त्यात कच्चे दूध किंवा मध मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर तयार हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी होईल आणि चेहरा अधिक सुंदर दिसेल.
केस कोरडे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने केसांवर लावा चहाचे पाणी, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
गुलाब पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग कमी होतील आणि चेहरा सुंदर दिसेल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.